गुरुवारी(७ ऑक्टोबर) कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात आयपीएल २०२१ हंगामातील ५४ वा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. कोलकाताने या सामन्यात मोठा विजय मिळवला. राजस्थानला या सामन्यात ८६ धावांनी पराभव पत्करावा लागला. सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर कोलकाताचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान कोलकातासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे.
प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी केकेआरचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल फिट होण्याची शक्यता आहे. केकेआरचे मुख्य मार्गदर्शक (मेंटॉर) डेविड हसी यांनी सामना संपल्यानंतर याबाबत माहिती दिली आहे.
हसी सामन्यातील विजयानंतर बोलत होता. तो म्हणाला, “रसेलचे बुधवारी फिटनेस परिक्षण झाले होते आणि मला वाटत आहे की, तो लवकरच पुनरागमन करेल. तो प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी खूप मेहनत करत आहे. त्याचे खेळणे केवळ आमच्यासाठीच नाही, तर टूर्नामेंटसाठीही महत्वाचे आहे. तो विश्वस्तरीय खेळाडू आहे आणि दर्शकांचे भरपूर मनोरंजन करतो.”
हसी पुढे बोतलाना म्हणला की, “टूर्नामेंटमध्ये आम्ही तसे क्रिकेट खेळू शकलो नाही, जसे आम्ही खळू इच्छित होतो. अशामध्ये काही वेळ मिळणे आमच्यासाठी चांगले राहिले. त्यामुळे आम्ही नव्या सुरुवातीपासून रननीती तयार करू शकलो.”
केकेआरने केलेल्या सुधारणेसाठी आणि संघाच्या प्रदर्शनासाठी हसीने प्रशिक्षक मॅक्युलमला श्रेय दिले. तो म्हणाला, “मॅक्युलम शांतचित्ताने काम करतो आणि त्याच्याकडे संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी योजना आहे. त्याचे मत आहे की, प्रत्येक खेळाडूने त्याचे सर्वश्रेष्ट प्रदर्शन करावे. तो प्रत्येकाला असे भासवतात की, तो संघाचा महत्वाचा व्यक्ती आहे.”
दरम्यान, राजस्थान रॉयल्सवर मिळवलेल्या विजयानंतर केकेआरने हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांपैकी ७ सामने जिंकले आहेत. केकेआर गुणतालिकेत १४ गुणांसह चौध्या स्थानावर पोहोचला आहे. प्लेऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या तीन संंघांनी त्याचे स्थान पक्के केले आहे. चौथ्या स्थानासाठी केकेआर प्रमुख दावेदार बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
या ४ भारतीयांनी केले आहे भारताव्यतिरिक्त इंग्लंड आणि पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व
आता गोलंदाजांनाही मिळू शकते फ्री हिट, ‘या’ स्पर्धेपासून क्रांतिकारक नियम होऊ शकतो लागू






