इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडणार आहे. शुक्रवारी (८ ऑक्टोबर) एकाच दिवशी एकाच वेळी दोन सामने खेळले जाणार आहे. हे दोन्ही सामने प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणार आहे. कारण चौथे स्थान मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमधील एका संघावर प्लेऑफमधील प्रवेशासाठी शिक्कामोर्तब होईल. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ चेन्नई सुपर किंग्स संघाला पछाडत दुसरे स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स,रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्स संघ २० गुणांसह सर्वोच्च स्थानी आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघ १८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ १६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करून दुसरे स्थान गाठण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
असे असेल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे दुसऱ्या स्थानी पोहचण्याचे गणित
सध्या चेन्नई सुपर किंग्स संघ १८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने जर दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत केले तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ १८ गुणांसह चेन्नई सुपर किंग्स संघाची बरोबरी करेल. पण, चेन्नई सुपर किंग्स संघ रन रेटचा बाबतीत खूप पुढे आहे. या संघाचा रनरेट +०.४५५ आहे.
या बाबतीत चेन्नई सुपर किंग्स संघाला मागे टाकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला इतिहास घडवावा लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला १६३ धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. जे जवळ जवळ अशक्य आहे. कारण यापूर्वी सर्वात मोठा विजय हा १४६ धावांचा होता.
असे असेल मुंबईचे प्लेऑफमध्ये पोहचण्याचे समीकरण
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. जर मुंबई इंडियन्स संघाला चौथ्या स्थानी पोहचायचे असेल. तर सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्यांना १७० धावांनी विजय मिळवावा लागेल. जर असे करण्यात मुंबई इंडियन्स संघ अपयशी ठरला, तर कोलकाता नाईट रायडर्स संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिमानास्पद! औरंगाबादची सायकलपटू सोनम शर्माने तब्बल दोन वेळेस पटकावला सुपर रॅंडोनिअर्सचा पुरस्कार
Video: भारताने पैसे देणे बंद केले, तर उध्वस्त होईल पाकिस्तान क्रिकेट, पीसीबी अध्यक्षांचा खुलासा
आता गोलंदाजांनाही मिळू शकते फ्री हिट, ‘या’ स्पर्धेपासून क्रांतिकारक नियम होऊ शकतो लागू





