विश्व क्रिकेटमध्ये असे असंख्य खेळाडू आहेत, ज्यांनी २ वेगवेगळ्या देशांसाठी क्रिकेट खेळले आहेत. भारतात देखील ४ असे खेळाडू होऊन गेले ज्यांनी भारतीय संघाव्यतिरिक्त इंग्लंड आणि पाकिस्तान संघासाठी क्रिकेट खेळले आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार उन्मुक्त चंदने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून अमेरिकेसाठी खेळण्याचा निर्णय घेतला होता. या लेखात आम्ही अशाच काही खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि इंग्लंड संघासाठी क्रिकेट खेळले.
१) इफ्तिखार अली खान पतौडी : इफ्तिखार अली खान पतौडी यांनी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी क्रिकेट खेळले. त्यांनी आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत एकूण ६ कसोटी सामने खेळले. भारतात जन्मलेले इफ्तिखार अली खान पतौडी इंग्लंडमध्ये पुढील शिक्षणाकरिता गेले होते. त्यांचा खेळ पाहून त्यांची इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली होती. त्यांनी इंग्लंड संघासाठी ३ कसोटी सामन्यात १४४ धावा केल्या होत्या. तसेच दुसरे विश्वयुद्ध झाल्यानंतर त्यांनी भारतीय संघाचे देखील प्रतिनिधित्व केले होते.
त्यांनी ३ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. यामध्ये त्यांना एक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर २ सामने अनिर्णित झाले होते.
२) गुल मोहम्मद – गुल मोहम्मदबद्दल बोलायचं झालं, तर ते पहिले क्रिकेटपटू होते ज्यांनी दोन देशांसाठी क्रिकेट खेळले. त्यांनी १९४६ ते १९५२ या कालावधीत भारतीय संघासाठी ८ कसोटी सामने खेळले.
त्यानंतर १९५२ मध्ये ते पाकिस्तानला गेले आणि १९५६ मध्ये त्यांनी पाकिस्तान संघासाठी पहिला सामना खेळला. त्यांनी आपल्या कारकीर्दीत एकूण ९ कसोटी सामने खेळले.
३) अब्दुल हफिज – अब्दुल हफिज यांनी देखील भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी भारतीय संघासाठी ३ कसोटी सामने खेळले. त्यानंतर ते पाकिस्तानला गेले आणि पाकिस्तान संघाकडून क्रिकेटच्या मैदानात उतरले. त्यांनी पाकिस्तान संघासाठी एकूण २३ कसोटी सामने खेळले. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी एकूण २६ कसोटी सामने खेळले. तसेच ते पाकिस्तानचे वित्तमंत्री देखील होते.
४)आमिर इलाही – आमिर इलाही हे तिसरे क्रिकेटपटू होते, ज्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी क्रिकेट खेळले. त्यांनी १९४७ मध्ये भारतीय संघासाठी एकमेव कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आमिर इलाही देखील पाकिस्तानला गेले होते. त्यानंतर पुढील क्रिकेट त्यांनी पाकिस्तानसाठी खेळले. त्यांनी ५ कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिमानास्पद! औरंगाबादची सायकलपटू सोनम शर्माने तब्बल दोन वेळेस पटकावला सुपर रॅंडोनिअर्सचा पुरस्कार
आता गोलंदाजांनाही मिळू शकते फ्री हिट, ‘या’ स्पर्धेपासून क्रांतिकारक नियम होऊ शकतो लागू





