मागील आठवड्यात आयपीएल २०२१ चे बिगुल वाजले. खेळाडूंना कायम राखण्याच्या व करारमुक्त करण्याच्या प्रक्रियेने याला सुरुवात झाली. त्याचबरोबर आता आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी होणारा खेळाडूंचा लिलाव कधी आणि कुठे होईल, याबाबत माहिती समोर आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान होणाऱ्या दुसऱ्या कसोटीनंतर चेन्नई येथेच आयपीएल २०२१ चा लिलाव १८ फेब्रुवारीला पार पडेल.
आयपीएल २०२१ च्या लिलावाबाबत आयपीएलच्या ट्विटर अकाउंटवरुन घोषणा करण्यात आली आहे. यात सांगितले आहे की हा लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नई येथे पार पडेल.
🚨ALERT🚨: IPL 2021 Player Auction on 18th February🗓️
Venue 📍: Chennai
How excited are you for this year's Player Auction? 😎👍
Set your reminder folks 🕰️ pic.twitter.com/xCnUDdGJCa
— IndianPremierLeague (@IPL) January 27, 2021
आयपीएल २०२१ लिलावासाठी स्टार खेळाडूंबाबत उत्सुकता
आयपीएल २०२१ ची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. संघांनी अनेक बडे खेळाडू करारमुक्त केले. यात ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल यांसारखे दिग्गज समाविष्ट आहेत. त्यामुळे आता या मोठ्या खेळाडूंना लिलावात किती रक्कम मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.
आठ संघांनी मिळून एकूण १३९ खेळाडूंना संघात कायम केले आहे तर एकूण ५७ खेळाडूंना मुक्त केले आहे. त्यानंतर आता ६१ जागांसाठी १८ फेब्रुवारीला लिलाव होणार आहे. या ६१ जागांपैकी २२ परदेशी खेळाडूंच्या जागेसाठी लिलाव होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रत्येक महिन्यात मिळणार सर्वोत्तम क्रिकेटपटू; आयसीसीकडून ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर
रिषभ पंतने सांगितले, ब्रिस्बेन कसोटीत विजयी फटका मारल्यानंतर ‘अशा’ होत्या भावना