---Advertisement---

तब्बल २.४० कोटींची बोली लागलेला मिस्ट्री स्पिनर होता डिप्रेशनमध्ये, मग एका फोनकॉलने बदलले आयुष्य

On: गुरूवार, सप्टेंबर 9, 2021 2:12 PM
---Advertisement---

राजस्थान राॅयल्सचा फिरकी गोलंदाज केसी करियप्पा सध्या संघासोबत यूएईमध्ये आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी दाखल झाला आहे. मिस्ट्री स्पिनर या नावाने ओळखला जाणारा केसी करियप्पा याला २०१५ मध्ये पंजाब किंग्ज संघाने २.४० कोरोड रुपयांची बोली लावून विकत घेतले होते. त्यावेळी त्याला कोणी ओळखत नव्हते आणि त्याला संघासाठी काही खास कामगिरी करता आली नाही. खराब प्रदर्शनामुळे पंजाब किंग्जने त्याला संघातून बाहेर काढले होते. तो आता राजस्थान राॅयल्स संघासाठी खेळतो.

तो राजस्थान राॅयल्सच्या पत्रकार परिषदेत बोलत असताना त्याने खुलासा केला आहे की, पंजाब किंग्जसाठी खेळल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये गेला होता. मात्र, एका फोन काॅलने त्याचे आयुष्य बदलले.

करियप्पाने त्याचे आयुष्य बदलणाऱ्या एका फोन काॅलविषयी बोलताना सांगितले की, “मी बेंगलोरमध्ये असाच फिरत होतो आणि माझ्या फिटनेसवर परिणाम होत होता, पण तेव्हा जुबिन सरांचा फोन आला आणि त्यांनी मला आयपीएल ट्रायलसाठी येण्यास सांगितले. मी स्तब्ध झालो होतो की, कोणीतरी मला ट्रायलला बोलवत आहे, कारण मी जवळपास एक वर्ष घालवले होते आणि माझे वजन जवळपास ९५ किलोग्राम होते. असे असले तरी मी तेथे गेलो आणि मी चांगली गोलंदाजी केली.”

भरूचाने त्याल विचारले होते की तुझी समस्या काय आहे. करियाप्पा याबाबत बोलताना म्हणाला, “जुबिन सरने याच्यानंतर मला विचारले की, मी २०१५ पासून तुला पाहत आहे, पण तुझी समस्या काय आहे ? तुझ्या फिटनेसची काय समस्या आहे ? आम्हाला तुझी गोलंदाजी पसंत आहे. मात्र, तुला तुझी फिटनेस ठिक करावी लागेल. त्यावेळी मला पुन्हा प्रेरणा मिळाली आणि मी फिटनेसाठी मेहनत केली. त्यामुळे मी माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे त्यांचा आणि राजस्थान राॅयल्स संघाचा आभारी आहे.”

आगामी मालिकेला जीवनातील सर्वात महत्वाचा वेळ सांगत तो म्हणाला की, तो या संधीचा वापर भारतीय संघात संधी मिळवण्यासाठी करेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात काहींची सरप्राईज एन्ट्री, तर काहींचा पत्ता कट; वाचा ५ महत्त्वाच्या गोष्टी

पाचव्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खूशखबर! ‘हा’ खेळाडू दुखापतीतून सावरला

कही खुशी कही गम! अश्विनचे ४ वर्षांनी भारतीय टी२० संघात पुनरागमन, पण सर्वाधिक विकेट्स घेणारा चहल बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---