आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. उर्वरित सामन्यांसाठी अफगाणिस्तानचे दोन दिग्गज खेळाडू राशिद खान आणि मोहम्मद नबी हे यूएईमध्ये दाखल झाले आहेत. हे दोघे सध्या विलगीकरणात आहेत आणि विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून ते संघासोबत सहभागी होतील.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद संघ व्यवस्थापन दोन्ही खेळाडूंच्या कुटुंबावर लक्ष ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या ज्याकाही घटना घडत आहेत, ते पाहता या दोन्ही खेळाडूंना संघाकडून अनुकूल वातावरण दिले जाईल.
विश्वसनीय सुत्रांनी सांगितले की, “ते आता यूएईमध्ये आहेत आणि विलगीकरणात राहत आहेत. ते एकटे नाहीत, त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही आहे आणि संघ पूर्णपणे त्यांच्यावर केवेळ स्पर्धेमध्येच नाही, तर प्रत्येक वेळी लक्ष ठेवेल. व्यवस्थापन या गोष्टीची पुष्टी करण्याचा प्रयत्न करेल की, ते चांगल्या मानसिकतेसह त्यांच्या क्षमतेप्रमाणे सर्वोत्तम प्रदर्शन करतील.”
आयपीएलसाठी सीपीएलमधून येणारे खेळाडू केवळ दोन दिवसांच्या विलगीकरणात राहणार आहेत. सुत्रांनी सांगितले की, जे खेळाडू सीपीएल तसेच श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील मालिकेत भाग घेतल्यानंतर त्यांच्या संघासोबत सामील होण्यासाठी यूएईमध्ये येतील, त्यांना दोन दिवसांसाठीच विलगीकरणात ठेवले जाईल. एकदा खेळाडूंची चाचणी झाली आणि अहवाल आल्यानंतर ते त्यांच्या संघात सामील होऊ शकतात.
आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांमधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. त्यांनी आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खेळलेल्या ८ सामन्यांपैकी ६ सामने जिंकले आहेत. पहिल्या टप्प्यात सनसायझर्स हैदराबादचे प्रदर्शन खूपच खराब राहिले होते असून त्यांनी खेळलेल्या सात सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकला आहे. या खराब प्रदर्शनामुळे हैदराबादचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टप्पा घेतला अन् सरळ दांडी गुल, अली खानच्या अचूक यॉर्करचा हा व्हिडिओ एकदा पाहाच
मानेच्या शस्त्रक्रियेनंतर ऑसी कर्णधार टिम पेन ऍशेस मालिकेसाठी उपस्थित राहणार का? वाचा काय म्हणाला
खेळ जुना, पण गडी नवे! आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ‘असे’ आहेत सर्व संघ