---Advertisement---

कोहली करणार फायद्याचा सौदा, टीम धवनला सतावणाऱ्या ‘या’ श्रीलंकन क्रिकेटरला देणार आरसीबीत संधी!

On: शनिवार, जुलै 31, 2021 11:44 AM
---Advertisement---

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावशाली कामगिरी करत बरेचसे क्रिकेटपटू सुप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझींच्या नजरेत येत असतात. श्रीलंका संघाच्या एका क्रिकेटपटूबाबत असेच काही घडले आहे. हा क्रिकेटपटू अजून कोण नसून गोलंदाज वानिंदु हसरंगा आहे.

कोरोनाच्या अडथळ्यानंतर १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीत (युएई) आयपीएल २०२१ चे राहिलेले सामने खेळवले जाणार आहेत. तत्पुर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील गोलंदाज एडम झम्पा याने उर्वरित हंगामातून माघार घेतली आहे. अशात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी संघ झम्पाच्या जागी हसरंगाला संघात सहभागी करण्याच्या विचारात आहे. हसरंगाने नुकत्याच भारताविरुद्ध पार पडलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत अप्रतिम प्रदर्शन केले आहे.

न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, आरसीबीने हसरंगाला संघात सहभागी करण्यासाठी बीसीसीआयकडे विनंती केली आहे. ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर झम्पाच्या जागी त्यांना हसरंगाला ताफ्यात दाखल करायचे आहे. झम्पा आणि वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन यांनी जागतिक महामारी कोविड-१९ मुळे आयपीएल हंगामाच्या अर्ध्यातून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता.

हसरंगा ठरेल झम्पाचा योग्य पर्यायी खेळाडू!
२४ वर्षीय हसरंगा आरसीबीसाठी झम्पाचा उत्कृष्ट पर्यायी खेळाडू ठरू शकतो. तो सध्या उल्लेखनीय लयीत असून भारताविरुद्धच्या टी२० मालिकेत त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्याने तिसऱ्या आणि निर्णायक टी२० सामन्यात ९ धावा देत ४ विकेट्स चटकावल्या होत्या. भारताविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये कोणत्या गोलंदाजाची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली आहे. या संपूर्ण टी२० मालिकेदरम्यान त्याने एकूण ७ विकेट्स घेतल्या आहेत. याखेरीज फलंदाजीतही त्याने महत्त्वपुर्ण खेळी केल्या आहेत. त्यामुळे गोलंदाजीसह हसरंगा गरजेच्या वेळी फलंदाजीतही हातभार लावू शकतो.

आरसीबी संघ यंदा दमदार लयीत
दरम्यान आजवर एकदाही आयपीएल चषक न उंचावू शकलेला आरसीबी संघ यंदा चांगल्या फॉर्मात आहे. त्यांनी आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात ७ सामने खेळले असून ५ सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर ताबा मिळवला आहे. विशेष म्हणजे, आरसीबीने हंगामातील सुरुवातीचे सलग ४ सामने जिंकले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘शनाका ब्रिगेड’च्या कामगिरीचे बोर्डाकडून भरभरुन कौतुक, टी२० मालिका विजयासाठी दिले ‘इतक्या’ लाखांचे बक्षीस

खुशखबर! कोलंबो टू इंग्लंड, विराटसेनेत सहभागी होण्यासाठी ‘या’ दिवशी उड्डाण भरणार सूर्यकुमार आणि शॉ

आयपीएल विजेत्या संघाने विकत घेतली सीपीएलमधील बार्बाडोस फ्रॅंचाईजी, ‘हे’ असेल नवे नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---