इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाचे आयोजन येत्या एप्रिल-मे महिन्यात केले जाण्याची शक्यता आहे. या चौदाव्या हंगामाचा लिलाव येत्या १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणार आहे. हंगामासाठी सगळेच संघ अत्यंत कसून तयारी करत आहेत. या लिलावासाठी जगभरातील १११४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. परंतु बीसीसीआयकडून फक्त २९१ खेळाडूंची लिलावासाठी अंतिम निवड करण्यात आली. या लिलावात काही संघ हे मोठया खेळाडूंवर सुद्धा बोली लावू शकतात ज्यात विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचा देखील समावेश आहे.
एकदाही आयपीएलच्या विजेतेपदावर आपले नाव न कोरणारा आरसीबी संघ हयावर्षी पूर्ण तयारी आणि ताकदीनिशी मैदानावर उतरण्याचा विचार करत असेल आणि अशातच हा संघ लिलावासाठी कोणत्या खेळाडूंवर बोली लावेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
बंगलोरच्या खात्यात सध्या ३५.९० करोड रुपये जमा असून हया वेळी हा संघ काही स्टार खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेऊ शकतात. आरसीबी संघ ह्या वेळी लिलावात कोणकोणत्या खेळाडूवर बोली लावू शकतो त्यावर एकदा कटाक्ष टाकूयात
आरसीबीला सलमीवीराची गरज
लिलावापूर्वी आरबीने ऍरॉन फिंच याची मुक्तता केली होती. अशा परिस्थितीत आरसीबी एखादया सलामीवीर फलंदाजावर बोली लावू शकतो. आरसीबीला एक चांगला सलामीवीर फलंदाज हवा आहे जो संपुर्ण स्पर्धेत देवदत्त पडीकक्कलला मोलाची साथ देऊ शकतो. आणि अशातच आरसीबी संघ ऍलेक्स हेल्स आणि डेव्हिड मालन यांसारख्या फलंदाजांना संघात समाविष्ट करण्याचे धोरण अवलंबू शकते. कारण देवदत्त पडीकक्कलच्या साथीने हे खेळाडू सलामीवीर म्हणून चांगली खेळी खेळू शकतात.
ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्यावरही असेल लक्ष –
आरसीबीकडे विराट कोहली आणि एबी डिविलीयर्ससारखे आक्रमक फलंदाज आहेत जे मोठी धावसंख्या उभारू शकतात. परंतु, हे जर आपली मोठी खेळी खेळण्यास अयशस्वी ठरल्यास बंगळुरू संघ संकटात सापडू शकतो. त्यामुळे आरसीबीला आपल्या संघात अनुभवी फलंदाजाला समाविष्ट करणे गरजेचे आहे, ज्यामुळे संघाची मधली फळी अधिक मजबूत होऊ शकेल.
ग्लेन मॅक्सवेल किंवा स्टीव्ह स्मिथला घेऊन संघात घेऊन ते ही उणीव भरुन काढू शकतात. क्रिस मॉरिस सुद्धा एक महत्वाचा खेळाडू आहे, त्यावरसुद्धा ते पुन्हा बोली लावू शकतात. याखेरीज श्रीलंकेचा थिसारा परेरावरही त्यांचे लक्ष असू शकेल.
चहलची साथ देण्यासाठी आणखी एक फिरकीपटू
आरसीबीच्या संघात युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर सारखे चांगले आणि अनुभवी फिरकीपटू आहेत, ज्यांनी संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले होते. परंतुस अजून एका फिरकीपटूला देखील आरसीबी आपल्या संघात समाविष्ट करून घेऊ शकतात. त्यामुळे चेन्नईने मुक्त केलेल्या हरभजन सिंगवर संघाचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणामुळे जो रूटने मागितली मोईन अलीची माफी
जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती