---Advertisement---

‘या’ कारणामुळे जो रूटने मागितली मोईन अलीची माफी

On: बुधवार, फेब्रुवारी 17, 2021 3:42 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळविला. पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारताने दुसऱ्या सामन्यात मात्र जोमाने पुनरागमन करत इंग्लंडला ३१७ धावांनी मात दिली. या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने भारतीय संघाने तिन्ही आघाड्यांवर आम्हाला चीतपट केल्याचे मान्य केले होते.

मात्र आता एका वेगळ्याच कारणासाठी जो रूट चर्चेत आला आहे. रूटने नुकतीच आपला संघसहकारी असलेल्या मोईन अलीची माफी मागितली आहे. सामन्यानंतर केलेल्या एका वक्तव्यामुळे रूटने ही माफी मागितली आहे.

काय होते विधान?

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अखेरच्या दोन कसोटीसाठी जाहीर केलेल्या संघात मोईन अलीला स्थान दिले नाही. यावर बोलताना रूट म्हणाला होता की, “आम्ही मोईनला संघाबाहेर केले नाही. त्याला घरी जाणे गरजेचे होते. त्यामुळे त्याचा संघात समावेश नसेल. त्याला बायो-बबलमधून बाहेर जाण्याची इच्छा होती आणि आम्ही त्याला रोखू शकत नव्हतो.”

मात्र मायदेशी परतण्याचा निर्णय मोईन अलीचा नसून इंग्लंडच्या निवड समितीने रोटेशन पॉलिसी अंतर्गत घेतलेला निर्णय होता. परंतु रूटने अनवधानाने याला मोईन अलीचा वैयक्तिक निर्णय असल्याचे संबोधले होते. पण हे लक्षात येताच रूटने हॉटेलवर जाताच मोईन अलीची मगी मागितल्याचे वृत्त आहे.

इंग्लंड संघ राबवत आहे ‘रोटेशन पॉलिसी’

कोरोना आजारामुळे इंग्लंडचा संघ सध्या ‘रोटेशन पॉलिसी’ राबवत आहे. त्याचमुळे, दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ व्यवस्थापनाने जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन व जोस बटलर या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत बेन फोक्स, ओली स्टोन व स्टुअर्ट ब्रॉड यांना संधी दिली होती. मात्र इंग्लंड संघाच्या या निर्णयावर मायकेल वॉन तसेच केविन पीटरसन यांनी नाराजी व्यक्त केली होती. मायकेल वॉन यांनी उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी मोईन अलीला स्थान न देण्याच्या निर्णयावरही सडकून टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या:

बिग ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

कसोटी क्रमवारी : रोहित, पंत, अश्विनची गरुडझेप, तर जो रुट, स्टुअर्ट ब्रॉडची घसरण

ब्रेकिंग! इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबाद कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाले स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---