भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांनी अनेकदा अष्टपैलू रवींद्र जडेजावर टीका केलेली आहे. त्यांनी २०१९ विश्वचषकामध्ये जडेजाला “बिट्स ऍंड पीस”(तुकड्यांमध्ये प्रदर्शन करणारा) खेळाडू म्हटले होत. आता पुन्हा एकदा मांजरेकरांनी जडेजाबाबत एक विधान केले आहे.
मांजरेकरांच्या मते जडेजा फक्त मध्यम गतीच्या गोलंदाजांविरोधातच चांगली खेळी करू शकतो. केकेआरविरुद्ध रविवारी (२६ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात जडेजाने महत्वाची खेळी केल्यानंतर काही दिवसांनी माजरेकरांनी हे विधान केले आहे. जडेजाने रविवारी केकेआरविरुद्ध झालेल्या सामन्यात महत्वाची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता.
त्याने केवळ ८ चेंडूत २२ धावा केल्या होत्या. यामधील २१ धावा त्याने प्रसिद्ध कृष्णाच्या एका षटकात केल्या होत्या. कृष्णाच्या एका षटकात त्याने दोन चौकार आणि दौन षटकारा मारले होते. तसेच आयपीएलच्या चालू हंगामात तो चांगल्या फार्ममध्ये दिसला आहे. त्याने खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये १४६ च्या सरासरीने १७८ धावा केल्या आहेत. तरीदेखील मांजरेकर जडेजावर नाराज दिसत आहेत. त्यांना त्याच्या फलंदाजीबाबत अजूनही शंका आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना मांजरेकर म्हणाले की, ‘मी अजूनही जडेजाच्या फलंदाजीबाबत आश्वस्त नाही. खासकरून चेन्नईने त्याला जी भूमीका दिली आहे. जर जडेजाला प्रत्येक सामन्यात समान भूमीका मिळते, तर तो चांगल्या वेगवान गोलंदाजासमोर त्याचे प्रदर्शन कायम ठेवू शकतो का? कारण त्याने आतापर्यंत प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर मोठे शाॅट खेळून धावा केल्या आहेत. हे पाहणे बाकी आहे की, तो त्या वेगवान गोलंदाजांसमोरही तेवढ्याच आक्रमतेने फलंदाजी करतो का, जे चांगल्या वेगाने गोलंदाजी करतात आणि जे त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात.’
मांजरेकरांनी ही गोष्टही मान्य केली आहे की, जडेजा त्याच्या संघासाठी तेव्हा जास्त महत्वाचा बनतो जेव्हा, टी२० क्रिकेटमध्ये त्याचे चार षटक फेकतो. त्याने आयपीएलमध्ये ३६ षटकांची गोलंदाजी केली असून ६.६६ च्या इकॅनोनीने ८ विकेट्स मिळवल्या आहेत.
ते याबाबत पुढे म्हणाले की, जडेजाने मागच्या दोन सामन्यात जे महत्वपूर्ण काम केले आहे, ते हे आहे की त्याने त्याच्या षटकांचा कोटा पूर्ण केला. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी तेव्हा मोकळा श्वास घेतो, जेव्हा जडेजा सामन्यात त्याचा चार षटकांचा कोटा पूर्ण करतो. जर जडेजाने त्याच्या षटकांचा कोटा पूर्ण टाकणे कायम ठेवले तर, संघासाठी त्याचे महत्व अजून वाढेल.
महत्त्वाच्या बातम्या –
मंधनाचा ऑस्ट्रेलियाला शतकी तडाखा! ‘हा’ कारनामा करणारी बनली पहिलीच भारतीय महिला क्रिकेटर
नाम बडे और दर्शन छोटे! आयपीएल २०२१ स्पर्धेतील या ‘३’ खेळाडूंची कामगिरी पाहून तुम्ही ही असच म्हणाल
ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृतीचे शानदार शतक, एकमेव कसोटीत भारत फ्रंटफूटवर






