---Advertisement---

काटे की टक्कर! टॉप २ मध्ये राहण्यासाठी धोनी, विराट व रिषभ लावणार ताकद

On: सोमवार, ऑक्टोबर 4, 2021 8:59 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ च्या चालू हंगामात आतापर्यंत तीन संघांनी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. तर सनरायझर्स हैदराबाद या शर्यतीतून बाहेर झाला आहे. तसेच उर्वरित चार संघ प्लेऑफमधील चौथ्या स्थानासाठी संघर्ष करत आहेत. प्ले ऑफमध्ये स्थान बनवलेल्या तीन संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचा समावेश आहे. प्ले ऑफमधील टॉप २ संघांना अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतात, याच पार्श्वभूमीवर या तीन संघांमध्ये टॉप २ मध्ये स्थान मिळवण्यासठी संघर्ष पाहायला मिळणार आहे.

चेन्नई दिल्ली आघाडीवर

चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघांनी प्रत्येकी १२ सामने खेळले असून प्रत्येकी १८ गुण मिळवले आहेत. रनरेटचा विचार केला तर चेन्नईचा संघ गुणतालिकेत सध्या पहिल्या स्थानावर आहे. चेन्नईला अजूत दोन सामने खेळायचे असून यामध्ये त्यांच्यापुढे दिल्ली आणि पंजाब संघाचे आव्हान असणार आहे. दिल्ली आणि चेन्नई यांच्यात होणाऱ्या सामन्यानंतर हे स्पष्ट होऊ शकेल की गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कोण राहिल. दिल्लीला चेन्नईविरुद्धचा सामना सोडून उर्वरित एक सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसोबत आहे. या सामन्यानंतरही गुणतालिकेत फेरबदल पाहायला मिळू शकतो.

आरसीबीला करावी लागणारी प्रयत्नांची पराकाष्टा

आरसीबीचा विचार केला तर त्यांनी १२ सामने खेळले आहेत आणि १६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. आरसीबीला राहिलेल्या दोन सामन्यात दिल्ली आणि हैदराबादसोबत संघर्ष करावा लागणार आहे. आरसीबीने जर दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर संघाला टॉप २ मध्ये संधी मिळण्याची शक्यता निर्माण होईल.

अशी असते प्ले ऑफ फेरी

दरम्यान, गुणतालिकेत टॉप २ मध्ये राहणारा संघ क्वालिफायर १ मध्ये एकमेकांसोबत भिडतात आणि जिंकणारा संघ अंतिम सामन्यात पोहोचतो. तर या सामन्यात पराभूत झालेला संघाकडे आणखी एक संधी असते. एलिमिनेटरमध्ये गुणतालिकेत ३ आणि ४ क्रमांकावरचे संघ एकमेकांशी भिडतात. या सामन्यात विजयी झालेला संघ क्वालिफायर २ मध्ये क्वालिफायर १ मधील पराभुत झालेल्या संघासोबत भिडतो. यानंतर क्वालिफायर १ आणि क्वालिफायर २ मधील विजयी संघ अंतिम सामन्यात आमने सामने येतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---