सर्वचजण आता इंडियन प्रीमीयर लीग २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. मे महिन्यात कोरोना संक्रमाणामुळे आयपीएल २०२१ चा हंगाम अर्ध्यातूनच स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमी निराश झाले होते. मात्र, आता या हंगामाचे उर्वरित सामन्यांना येत्या रविवारपासून (१९ सप्टेंबर) युएईमध्ये सुरुवात होत आहे. त्यामुळे आता सर्वच संघांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
दरम्यान, आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरु होण्यापूर्वी अनेक संघांना मोठे धक्के बसले. त्यांचे महत्त्वाच्या खेळाडूंनी विविध कारणांनी दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली. त्यामुळे संघांना माघार घेतलेल्या खेळाडूंचे बदली खेळाडू शोधावे लागले. त्यामुळे अनेक संघांमध्ये नवीन नावं सामील झाली तर काही नावं गायब झाली.
आयपीएल २०२१ मध्ये सहभागी असलेल्या ८ संघांपैकी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोनच संघांतील कोणताही खेळाडू दुसऱ्या टप्प्यातून बाहेर गेला नाही. त्यामुळे त्यांचे संघ आहे तसेच राहिले. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मात्र, मोठे धक्के बसले. त्यांच्या संघातील ऍडम झम्पा, केन रिचर्डसन, फिन ऍलेन, डॅनिएल सॅम्स, वॉशिंग्टन सुंदर, स्कॉट कुगलेजीन या खेळाडूंनी माघार घेतली. त्यामुळे या संघात दुसऱ्या टप्प्यासाठी टीम डेविड, दुश्मंता चमिरा, वनिंदू हसरंगा, आकाश दीप आणि जॉर्ज गार्टन हे खेळाडू नव्याने सामील झाले.
याशिवाय सनरायझर्स हैदराबादचच्या जॉनी बेअरस्टो या एकमेव फलंदाजाने माघार घेतली. त्यामुळे त्याचा बदली खेळाडू म्हणून शेर्फेन रुदरफोर्ड संघात सामील झाला. हैदराबादप्रमाणेच दिल्ली कॅपिटल्स संघाती एकाच खेळाडूने माघार घेतली. दिल्ली संघात ख्रिस वोक्सने माघार घेतल्याने बेन ड्वारशुई हा गोलंदाज सामील झाला. तसेच माजी कर्णधार श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सलाही मोठे धक्के बसले. त्यांचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्सने दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली. त्यामुळे या संघात टीम साऊथीचा प्रवेश झाला. राजस्थान रॉयल्सलाही यंदा मोठे झटके बसले. त्यांच्या संघातील जोस बटलर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, अँड्र्यू टाय असे प्रमुख परदेशी खेळाडू दुसऱ्या टप्प्यातून विविध कारणांनी बाहेर पडले. त्यामुळे या संघात ग्लेन फिलिप्स, ताब्राईज शम्सी, ओशान थॉमस आणि एविन लुईस हे खेळाडू नव्याने सामील झाले.
पंजाब किंग्स संघातील झाय रिचर्डसन, रिली मेरेडिथ आणि डेविड मलान यांनी दुसऱ्या टप्प्यातून नाव मागे घेतले आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी संघात नॅथन एलिस आदिल राशिद आणि एडेन मार्करम हे बदली खेळाडू म्हणून सामील झाले आहेत.
या लेखातून आपण दुसऱ्या टप्प्यासाठी तयार झालेले सर्व संघ जाणून घेऊ
चेन्नई सुपर किंग्ज:
एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सुरेश रैना नारायण जगदीसाबन, ऋतुराज गायकवाड, केएम आसिफ, कर्ण शर्मा, अंबाती रायुडू, दीपक चाहर, फाफ डू प्लेसिस, शार्दुल ठाकूर, मिशेल सॅन्टनर, ड्वेन ब्राव्हो, लुंगी एन्गिडी, सॅम करन, रवींद्र जडेजा, इम्रान ताहिर, रॉबिन उथप्पा, मोईन अली, के गौतम, चेतेश्वर पुजारा, एम. हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा, सी हरी निशांत, आर साई किशोर, जोश हेजलवूड.
मुंबई इंडियन्स:
रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ख्रिस लिन, मोहसिन खान, सौरभ तिवारी, ट्रेंट बोल्ट, ऍडम मिलने, नॅथन कुल्टर-नाईल, पियुष चावला, जेम्स नीशम, युधवीर चरक, मार्को जॅन्सेन, अर्जुन तेंडुलकर.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर:
विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, युझवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शाहबाज अहमद, पवन देशपांडे, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, काइल जेमीसन, डॅन ख्रिश्चन, सुयेश प्रभुदेसाई, केएस भरत, टीम डेविड, दुश्मंता चमीरा, वनिंदू हसरंगा
दिल्ली कॅपिटल्स:
रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, ड्वारशुई, एन्रिट नॉर्किए, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, लुकमान हुसेन मेरीवाला, एम सिद्धार्थ, टॉम करन, सॅम बिलिंग्स, प्रविण दुबे, विष्णू विनोद
राजस्थान रॉयल्स:
संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवातिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, तब्राईज शम्सी, ओशान थॉमस, एविन लुईस, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहीम, चेतन साकरिया, के.सी करिअप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंग, ग्लेन फिलिप्स
पंजाब किंग्ज:
केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ख्रिस गेल, मयंक अगरवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हुडा, प्रभसिमरन सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नळकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, इशान पोरेल, एडेन मार्करम, आदिल रशिद, शाहरुख खान, मोझेस हेन्रिक्स, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंह, फॅबियन ऍलन, सौरभ कुमार, नॅथन एलिस
कोलकाता नाईट रायडर्स:
ओएन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, गुरकीरत सिंग मान, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुबमन गिल, सुनील नारायण, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, पवन नेगी, टीम सेफर्ट, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नायर, हरभजन सिंग, बेन कटिंग, व्यंकटेश अय्यर, टीम साऊथी
सनरायझर्स हैदराबाद:
केन विलियम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, विराट सिंग, प्रियम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, विजय शंकर, मोहम्मद नबी, रशीद खान, शेर्फेन रुदरफोर्ड, वृद्धीमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, बासिल थम्पी, जेसन होल्डर, जगदीशा सुचित, केदार जादव, मुजीब उर रहमान, जेसन रॉय.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात सर्वात कमी धावसंख्येवर बाद होणारे संघ, भारत ‘या’ क्रमांकावर
टेलरला मिळाला नाही विजयी निरोप, आयर्लंडने तिसऱ्या वनडेत झिम्बाब्वेला केलं पराभूत
‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये ठोकू शकतो ४० चेंडूत शतक, गौतम गंभीरचा विश्वास






