आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू झाला आहे. भारतात खेळवल्या गेलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण २९ सामने झाले आहे. आता उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये होणार आहेत. आयपीएल प्रत्येक दिवसाबरोबर रोमांचक होत आहे. प्लेऑफची लढाई तीव्र झाली आहे. याच बरोबर चाहते देखील आयपीएलचे सामने पाहण्यासाठी स्टेडियमवर परतले आहेत. जगभरातील चाहते आयपीएलच्या थरारात मग्न असताना, अफगाणिस्तानमधील चाहते या स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकणार नाहीत.
अर्थात, यामागचे कारण तालिबानचा कायदा आहे. इस्लामविरोधी गोष्टींमुळे आयपीएल २०२१ च्या प्रसारणावर अफगाणिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. सामन्यादरम्यान चीअर लीडर्सच्या नृत्यामुळे आणि स्टेडियममध्ये वर्जित असलेल्या केशरचनेसह महिलांच्या उपस्थितीवर तालिबानचा आक्षेप आहे.
तालिबान शासित अफगाणिस्तान सरकारचा असा ठाम विश्वास झाला आहे की, आयपीएल स्पर्धा त्यांचे नियम आणि विश्वास यांच्या विरोधात काम करत आहे. म्हणूनच या स्पर्धेचा यूएईतील दुसरा टप्पा अफगाणिस्तानमध्ये प्रसारित होणार नाही. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी मीडिया व्यवस्थापक इब्राहिम मोमांड यांनीही या बाबत माहिती दिली.
Afghanistan national 📻 📺 will not broadcast the @IPL as usual as it was reportedly banned to live the matches resumed tonight due to possible anti-islam contents, girls dancing & the attendence of barred hair women in the 🏟️ by Islamic Emirates of the Taliban. #CSKvMI pic.twitter.com/dmPZ3rrKn6
— M.Ibrahim Momand (@IbrahimReporter) September 19, 2021
तत्पुर्वी, एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२१ च्या यूएई लेगचा पहिला सामना जिंकला. सीएसकेने मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव केला. चेन्नईच्या या विजयात मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ८८ धावांची दमदार खेळी करत चेन्नईला ६ बाद १५६ धावांपर्यंत पोहचवले. या खेळीत त्याने चार षटकार आणि ९ चौकार लगावले.
मुंबईकडून सौरभ तिवारी वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. सौरभने एकाकी अर्धशतक झळकावले. पण तो संघास विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. त्याने ५० धावांची खेळी केली. मुबंईच्या वरच्या फळीने फलंदाजीत निराशा केल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. मुंबईला १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ८ बाद १३६ धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
चर्चा आयपीएलच्या प्लेऑफची! ‘हे’ संघ गुणतालिकेत राहतील पहिल्या चार स्थानांवर, गंभीरचा अंदाज
सामनावीर ऋतुराज म्हणतोय, ‘जेव्हा धोनी तुमच्या बरोबर असतो, तेव्हा…’
वानिंदू हसरंगाचे होऊ शकते आयपीएल पदार्पण, आरसीबीची ‘अशी’ असेल संभावित ‘प्लेइंग इलेव्हन’