आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व संघाचे एक-एक सामने खेळले गेले आहेत. गुरुवारी (२३ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना खेळला गेला. यामध्ये केकेआलने ७ विकेट्स राखून मुंबई इंडियन्सवर मात केली आहे. आयपीएलमधील त्याचा दुसरा सामना खेळणाऱ्या वेंकटेश अय्यरने पहिल्या सामन्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही दमदार खेळी केली. त्याने या सामन्यात ३० चेंडूंमध्ये ५३ धावा केल्या आहेत. सामन्यात त्याने कृणाल पांड्याला एक दमदार षटकार मारला. त्यानंतर त्याच्या या शाॅटची खूप चर्चा होत आहे.
वेंकटेश अय्यर सध्या आयपीएमध्ये नवखा असला तरी त्याच्यात खूप आत्मविश्वास दिसत आहे आणि तो गोलंदाजांना निर्भीडपणे सामोरे जात आहे. त्याने मुंबईविरुद्ध केलेल्या ५३ धावांच्या खेळीत ३ षटकारांचा समावेश होता. त्यातील कृणाल पांड्याला मारलेला षटकार लक्षवेधी ठरला आहे. कृणाल केकेआरच्या फलंदाजीवेळी सातव्या षटकात गोलंदाजी करण्साठी आला होता आणि षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वेंकटेशने त्याल एक मोठा षटकार मारला व चेंडू मैदानाबाहेर गेला.
वेंकटेशने कृणाल पांड्याला मारलेला या षटकारानंतर मैदानाबाहेर बसलेले केकेआरचे खेळाडू उत्साहित झालेले दिलले. त्यांना पाहून हा वेंकटेशचा हा षटकार किती दमदार होता, हे लक्षात येत. वेंकटेशची ही खेळी संघाच्या विजयामध्ये महत्वाची ठरली.
https://twitter.com/PrabS619/status/1441101073452699652?s=20
दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीला केकेआरने नाणेफक जिंकून प्रथम मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. मुंबईने फलंदाज करताना २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावत १५५ धावांचे आव्हान उभे केले होते. मुंबईसाठी सर्वाधिक ५५ धावा क्विंटन डी काॅकने केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने १५.१ षटकांत आणि केवळ ३ विकेटच्या नुकसानासह १५९ धावा केल्या आणि सामन्यात विजय मिळवला
मुंबईविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर केकेआर आयपीएलच्या गुणतालीकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्स जो आधी चौथ्या क्रमांकावर होता तो आता सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे
महत्त्वाच्या बातम्या-
‘गुलिगत धोका’! रोहितची विकेट काढत नरेनची मातब्बर गोलंदाजांशी बरोबरी, नोंदवला खास विक्रम
‘हे’ आहेत बक्कळ पैसा कमावणारे कर्णधार; कोहलीपेक्षा जास्त ‘या’ दिग्गजांची आहे कमाई
फ्रंट फुटवर येत शुबमनचा कडक षटकार अन् चेंडू सरळ स्टेडियमबाहेर, व्हिडिओ पाहून आठवेल ‘तो’