आयपीएल २०२१ च्या ४३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) हे संघ एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात आरसीबीने राजस्थानवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. सामन्यात आरसीबीचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १८ धावा दिल्या आणि २ विकेट्स घेतल्या. आगामी टी २० विश्वचषकात चहलला भारतीय संघात संधी दिली गेली नसून आता त्याचे चांगले प्रदर्शन पाहून याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
चहलने याआधी झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध केवळ ११ धावा दिल्या आणि तीन विकेट्स मिळवल्या होत्या. या सामन्यात त्याने एका षटकात तर एकही धाव दिली नव्हती. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यात ११ विकेट्स मिळवल्या आहेत. त्याच्या या उत्कृष्ट फॉर्ममुळे भारतीय संघाच्या निवडकर्त्यांवर सतत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
आगामी टी २० विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला गेला असून सर्वात हैराण करणारी गोष्ट ही आहे की, चहलचे आतापर्यंतचे यूएईतील प्रदर्शन पाहता ते अप्रतिम आहे. त्याना आतापर्यंत यूएईमध्ये २४ सामने खेळले असून यापैकी ४ सामन्यात त्याला मॅन ऑफ द मॅच निवडले गेले आहे. याव्यतिरिक्त त्याने भारतात ८५ आयपीएल सामने खेळले आहेत, पण यापैकी एकाही सामन्यात त्याला मॅन ऑफ द मॅच निवडले गेले नाही. त्याचे युएईच्या मैदानावरील प्रदर्शन पाहता त्याला टी २० संघात संधी न मिळणे हैराण करणारे आहे.
राजस्थानविरुद्धचा सामना संपल्यानंतर चहल म्हणाला की, “आयपीएल २०२१ च्या पहिल्या फेजमध्ये मला पहिल्या तीन सामन्यात विकेट मिळाले नव्हते. पण काही दिवसांच्या ब्रेकनंतर मी स्वत्त:ला समर्थन दिले. मी श्रीलंकेच्या मालिकेत चांगली गोलंदाजी केली आणि माझा आत्मविश्वास वाढला आहे. मी येथे त्याच लयीला कायम ठेवू इच्छित होतो.”
दरम्यान, सामन्यात आरसीबीने राजस्थानला शेवटच्या ९ षटकात केवळ ४९ धावा करू दिल्या आणि यादरम्यात ८ विकेट्सही मिळवल्या. राजस्थानने २० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर १४९ धावा केल्या आणि आरसीबीला १५० धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात आरसीबीने अवघ्या १७.१ षटकात केवळ तीन विकेट्स गमावून लक्ष्य सहज गाठले.
महत्वाच्या बातम्या-
मॉरिसचा खणखणीत शॉट आणि बंदुकीच्या गोळीच्या वेगाने कोहलीने अडवला चेंडू; फलंदाजही म्हणे, काय होतं हे?
मॅक्सवेल पॅड घालून फलंदाजीसाठी होता तयार; मग चहलने केलं असं काही की, कॅमेरामनही खदखदून हसला!
अखेर ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, कसोटी अनिश्चित काळासाठी ढकलली पुढे