मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलचा (IPL 2022) १५ वा हंगाम सुरु होणार आहे. तत्पुर्वी आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. आयपीएल २०२२ पूर्वी कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या (ms dhoni) चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) खेळाडूही फॉर्ममध्ये येऊ लागले आहेत. बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये (BPL) सीएसकेच्या ड्वेन ब्राव्हो आणि मोईन अलीची शानदार खेळी पाहायला मिळाली. यातच आता न्यूझीलंडचा अॅडम मिल्ने हे आणखी एक नाव जोडले गेले आहे.
मिल्नेने देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत फोर्ड ट्रॉफीमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याला नुकताच पार पडलेल्या आयपीएल लिलावात सीएसकेने १.९० कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
अॅडम मिल्नेने फक्त ७ षटकांमध्येच संघाचा विजय निश्चीत केला आहे. आपल्या या कामगिरीने त्याने सीएसकेला संदेश दिला आहे की, त्यांनी त्याच्यासाठी केलेला करार अनावश्यक नसून तो योग्य आहे. वेलिंग्टन फायरबर्ड्स आणि सेंट्रल स्टॅग्स यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेने महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. या सामन्यात अॅडम मिल्ने सेंट्रल स्टॅग्स संघाचा भाग होता.
या सामन्यात वेलिंग्टन फायरबर्ड्स संघाने प्रथम फलंदाजी करत ३४ षटकांत ८ गडी गमावून १९१ धावा केल्या. सेंट्रल स्टॅग्सकडून अॅडम मिल्ने हा संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
मिल्नेने ७ षटकांत गोलंदाजी करत ३५ धावा देत फायरबर्ड्सच्या ३ फलंदाजांना बाद केले. अॅडम मिल्नेच्या या गोलंदाजीचा परिणाम असा झाला की, त्यामुळे निर्माण झालेल्या दबावामुळे वेलिंग्टन फायरबर्ड्स संघाने अवघ्या ४५ धावांत ६ विकेट गमावल्या. वेलिंग्टनने ११८ ते १६३ धावांदरम्यान या विकेट गमावल्या. वेलिंग्टन संघाने सेंट्रल स्टॅग्ससमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे त्याने २४.५ षटकांत ८ गडी गमावत पूर्ण केले. अॅडम मिल्नेच्या संघाने हा सामना २ गडी राखून जिंकला. सेंट्रल स्टॅग्सकडून फलंदाजीत रॉस टेलरची शानदार खेळी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. त्याने ५० धावा केल्या. मागील सामन्यात त्याने शतक झळकावले होते.
अॅडम मिल्ने आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. त्याने त्याची मूळ किंमत १.५० कोटी रुपये ठेवली होती. पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यावर लिलावात बोली लावली. त्याला १.९० कोटी रुपयांमध्ये सीएसकेने विकत घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बनला अफगाणिस्तानचा प्रशिक्षक, बांगलादेश दौऱ्यावर स्विकारणार जबाबदारी
कसोटी कर्णधार बनताच व्हायरल झाले रोहितचे तीन वर्षापूर्वीचे ‘ते’ ट्विट
श्रीलंकेने राखली इभ्रत! अखेरच्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर केली मात