---Advertisement---

सीएसकेमध्ये महाराष्ट्रीयन खेळाडूंची एकहाती सत्ता! ऋतुराजसह ‘हे’ ५ शिलेदार सामील

On: रविवार, फेब्रुवारी 13, 2022 6:25 PM
Ruturaj Gaikwad
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) येत्या हंगामासाठी बीसीसीआयने बेंगलोरमध्ये मेगा लिलाव (IPL mega auction) घेतला. १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव पार पडला. लिलावात अनेक दिग्गज सहभागी झाले होते. त्यातील काहीजण मालामाल झाले, तर काहींना खरेदीदारसुद्धा मिळाले नाहीत. खेळाडूंचे यापूर्वीचे प्रदर्शन पाहून मेगा लिलावात त्यांच्यावर बोली लागली, तर काहींना अनपेक्षितपणे मोठी रक्कम मिळाल्याचे दिसले. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) चांगलीच खरेदी केली. सीएसकेने महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंवर विश्वास दाखवल्याचे एकंदरित पाहायला मिळाले.

पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चेन्नईने अधिक खेळाडूंना संघासोबत जोडले. अशात चेन्नई संघातील महाराष्ट्रीय खेळाडूंची संख्या आता ५ वर पोहोचली आहे. नुकताच १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू राजवर्धन हंगारगेकर याला चेन्नईने मेगा लिलावात १ कोटी ५० लाख रुपयांमध्ये विकत घेतले. हंगारगेकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघासाठी खेळतो.

तसेच महाराष्ट्र संघातील अजून एक खेळाडू मुकेश चौधरीलाही चेन्नईने संघात सामील केले. चौधरीला चेन्नईने बेस प्राइस २० लाखांमध्ये खरेदी केले. त्याव्यतिरिक्त भारतासाठी अलिकडेच ज्याने पदार्पण केले आणि महाराष्ट्र संघाचा महत्वाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडला सीएसकेने आधीच रिटेन केलेले आहे. महाराष्ट्र संघातील हे तिन्ही खेळाडू पुढच्या आयपीएल हंगामात सीएसकेसाठी खेळणार आहेत.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट संघासाठी खेळणारेही दोन खेळाडू चेन्नईने संघात सामील केले आहे. तुषार देशपांडे आणि प्रशांत सोळंकी हे मुंबई संघाचे महत्वाचे खेळाडू आहेत, जे पुढच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करताना दिसतील. देशपांडेला विकत घेण्यासाठी चेन्नईने त्याची बेस प्राइस २० लाख, तर सोळंकीसाठी १ कोटी २० लाख रुपये खर्च केले आहेत. आयपीएल २०२२ मध्ये हे महाराष्ट्रीयन क्रिकेटपटू चेन्नईसाठी काय कमाल करतात हे पाहण्यासारखे असेल.

दरम्यान, मेगा लिलावापूर्वी रिटेने केलेल्या खेळाडूंचा विचार केला, चेन्नईने चार महत्वाचे खेळाडू संघात कायम ठेवले होते. सर्वप्रथम कर्णधार एमएस धोनीला संघाने १२ कोटीमध्ये रिटेने केले होते. त्यानंतर धोनीपेक्षा अधिक रक्कम देत अष्टपैलू रविंद्र जडेजाला १६ कोटींमध्ये रिटने केले होते. तसेच इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू मोईन अलीला संघाने ८ कोटी देऊन रिटेने केले, तर ऋतुराज गायकवाडला रिटने करण्यासाठी ६ कोटी खर्च केले गेले होते.

महत्वाच्या बातम्या –

न्यूझीलंडच्या २ बहिणी टीम इंडियावर पडल्या भारी, ६२ धावांनी पहिली वनडे जिंकत मालिकेचा केला शुभारंभ

पंड्याची उणीव भरून काढण्यासाठी मुंबईने खेळला ‘या’ खेळाडूवर ८ कोटीचा दाव

डेवन कॉन्वेचा चेन्नईमध्ये प्रवेश !! तब्बल इतक्या कोटींची लागली बोली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---