इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा हंगाम दिवसेंदिवस अधिक रोमांचक होत चालला आहे. प्रेक्षकांना दररोज दोन संघातील संघर्ष पाहायला मिळत आहे. चालू हंगामातील जवळपास प्रत्येक सामना हा घासून झाला आहे. गुजरात टायटन्ससाठी हा त्यांचा पहिला हंगाम आहे आणि यामध्ये त्यांच्या संघाने जबरदस्त प्रदर्शन केले आहे. हंगामातील पहिल्या ९ सामन्यांपैकी ८ सामने जिंकणारा गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांना मिळालेल्या १६ गुणांमुळे त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के आहे. चला तर राहिलेल्या तीन संघांवर नजर टाकू, जे प्लेऑफमध्ये स्थान बनवू शकतात.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
२. लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Gaints)
केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वातील लखनऊ सुपर जायंट्सने चालू आयपीएल हंगामात चांगले प्रदर्शन केले आहे. हंगामातील सुरुवातीच्या १० सामन्यांपैकी ७ सामने त्यांनी जिंकले आहेत. त्यांच्याकडे केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांच्या रूपात चांगली सलामीवीर जोडी आहे. हे दोन सलामीवीरांकडे विरोधी संघांचे गोलंदाजी आक्रमण उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. त्यानंतर मध्यक्रमात आयुष बदोनीने स्वतःला सिद्ध केले आहे, जो कोणत्याही गोलंदाजाची धुलाई करू शकतो. अशात संघाने आता राहिलेल्या चार सामन्यांपैकी एक सामना जिंकला, तर त्यांचे प्लेऑफमधील स्थान पक्के होईल.
२. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)
संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२२मध्ये उत्तम फॉर्म दाखवला आहे. राजस्थानने १० पैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय खेळपट्टी नेहमीच फिरकी गोलंदाजांसाठी मदतगार राहिली आहे. अशात राजस्थानच्या रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहलने विरोधी फलंदाजांना त्यांच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर देखील जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. हंगामात त्याने तीन शतकांच्या मदतीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच, वेगवान गोलंदाजाच्या रूपात त्यांच्याकडे ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा आहेत. या खेळाडूंच्या जोरावर राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये स्थान बनवू शकते.
३. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydarabad)
सनरायझर्स हैदराबादने हंगामातील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले होते, पण नंतर पुढच्या ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकून अप्रतिम पुनरागमन केले. संघाकडे सध्या १० गुण आहेत आणि गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. हैदराबादची ताकत त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे. त्यांच्याकडे उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजनसारखे गोलंदाज आहेत. उमरान मलिकने नुकताच हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे आणि तो पर्पल कॅपच्या शर्यतीत देखील आहे. त्यांचे सलामीवीर केन विलियम्सन आणि अभिषेक शर्मा हेदेखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजस्थानविरुद्धच्या खेळीमुळे चर्चेत आलेल्या रिंकू सिंगला एकवेळ बीसीसीआयने केले होते बॅन, वाचा किस्सा
आला आला, बांद्रा एक्सप्रेस आला! अर्जुनच्या पदार्पणाची चातकासारखी वाट पाहतायत चाहते, कधी मिळणार संधी?