Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आला आला, बांद्रा एक्सप्रेस आला! अर्जुनच्या पदार्पणाची चातकासारखी वाट पाहतायत चाहते, कधी मिळणार संधी?

आला आला, बांद्रा एक्सप्रेस आला! अर्जुनच्या पदार्पणाची चातकासारखी वाट पाहतायत चाहते, कधी मिळणार संधी?

May 3, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Arjun-Tendulkar

Photo Courtesy: Twitter/mipaltan


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाला अपेक्षित यश आलेले नाही. ५ वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई संघाने ८ सामन्यांनंतर हंगामातील आपले विजयाचे खाते उघडले आहे. या ८ सामन्यांमध्ये फलंदाजांबरोबर गोलंदाजांनाही साजेशे प्रदर्शन करता आले नव्हते. अशावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करण्याची मागणी चाहते करत होते.

मुंबईचा संघ (Mumbai Indians)आता शुक्रवारी (०६ मे) गुजरात टायटन्सविरुद्ध आपला दहावा आणि हंगामातील ५१वा सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मुंबईचे खेळाडू कसून सराव करत आहेत. अगदी अर्जुनही (Arjun Tendulkar) आयपीएलमधील आपला पहिला सामना (Arjun Tendulkar IPL Debut) खेळण्यासाठी भरपूर मेहनत घेत आहे. मुंबई संघाने त्याचा सराव सत्रातील गोलंदाजीचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यानंतर चाहत्यांना अर्जुनला प्लेइंग इलेव्हनमध्ये (Fans Demand About Arjun Tendulkar’s Debut) खेळवण्याची मागणी केली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

मुंबईने सोमवारी (०२ मे) त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अर्जुन डाव्या हाताने गोलंदाजी करताना दिसत आहे. तसेच तो चांगल्या लयीत असल्याचेही दिसत आहे. मुंबईने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले आहे की, कृपया त्याला एक संधी द्या. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, मुंबई इंडियन्ससाठी लवकरच पदार्पण करणार आहे?. तसेच एकाने लिहिले आहे की, अरे कोन आला रे कोन आला… आपला बांद्रा एक्सप्रेस आला.

View this post on Instagram

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

वेगवान गोलंदाज असलेला अर्जुन (Arjun Tendulkar) गतवर्षीपासून मुंबई संघाचा (Mumbai Indians) भाग आहे. मात्र अद्याप त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळालेली नाही. परंतु नेट्समध्ये सातत्याने दमदार गोलंदाजी प्रदर्शन करत तो आयपीएलप्रेमींचे लक्ष वेधताना दिसतोय. मुंबईने २२ वर्षीय अर्जुनला मेगा लिलावात ३० लाख रुपयांना विकत घेतले होते. तो आयपीएल २०२१ मध्येही मुंबई संघाचा भाग होता, परंतु दुखापतीमुळे तो आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर झाला होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

स्वत:ला दिलेल्या वचनाला जागला रिंकू सिंग; सामन्यापूर्वी हातावर लिहिली होती प्रेरणा देणारी ‘ही’ गोष्ट

‘फाफ आता माझ्यावर जळत असेल’, एकेकाळी डावाची सुरुवात करणाऱ्या सहकाऱ्याबद्दल असं का म्हणाला ऋतुराज?

IPL 2022 | असे ३ खेळाडू ज्यांना आयपीएल फ्रँचायझींनी केले होते रिटेन, पण विश्वासास ठरले अपात्र


ADVERTISEMENT
Next Post
Mohsin-Khan-and-Gautam-Gambhir

'...तर तो लवकरच एक चांगला खेळाडू बनेल', मोहसिन खानची गोलंदाजी पाहून गंभीर खुश

Rashid-Khan

हार्दिक पंड्याच्या मुलाला कडेवर घेऊन राशिद खानने लावले ठुमके; पाहून तुमचेही थिरकतील पाय

Rinku-Singh

राजस्थानविरुद्धच्या खेळीमुळे चर्चेत आलेल्या रिंकू सिंगला एकवेळ बीसीसीआयने केले होते बॅन, वाचा किस्सा

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.