सर्वाधिक ५ आयपीएल ट्रॉफी जिंकणारा संघ मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२२ची सुरुवात खूपच निराशाजनक राहिली आहे. हंगामातील पहिल्या तीन सामन्यांमध्य मुंबईने लागोपाठ पराभव पत्करले आहेत. दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि आता मंगळवारी (५ एप्रिल) केकेआरविरुद्धचा सामनाही मुंबईने गमावला. याच पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्माकडून संघातील सर्व खेळाडूंना काही महत्वाच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
केकेआरविरुद्धच्या (MI vs KKR) सामन्यात पराभव मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंसोबत बोलला. रोहित म्हणाला की, “आपण याठिकाणी कोणा एका खेळाडूला दोषी ठरवू शकत नाही. यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. आपण सर्वजण एकत्र जिंकतो आणि एकत्र हारतो. मला ही गोष्ट एवढी सरळ-सोपी वाटते.”
“मला वाटते की, प्रत्येकाकडून अजून थोड्या उत्सुकतेची गरज आहे. जेव्हा आम्ही खेळतो, विषेशतः या स्पर्धेत, तेव्हा उत्सुकता खूप- खूप महत्वाची होऊन बसते. कारण विरोधी संघ वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी ते, वेगळ्या रणनीतीसह येत असतात. आपण नेहमी त्यांच्या पुढे असण्याची गरज असते. आपण नेहमी त्यांच्यावर वर्चस्व करणे गरजेचे असते,” असे रोहित खेळाडूंना सांगत होता.
रोहित पुढे बोलताना म्हणाला की, “आपण फक्त एकाच पद्धतीने असे करू शकतो आणि ती आहे बॅट आणि चेंडूने मैदानात थोडीशी भूक आणि मैदानात थोडीशी उत्सुकता दाखवणे.” रोहित यावेळी असेही म्हणाला की, घाबरण्याची काहीच गरज नाहीय. महत्वाच्या क्षणांवर एका संघाचा रूपात खेळा आणि शेवटी याच गोष्टीमुळे फरक पडत असतो.
𝕀𝕟 𝕥𝕙𝕚𝕤 𝕥𝕠𝕘𝕖𝕥𝕙𝕖𝕣
Skipper’s message to the entire team 👊💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #KKRvMI @ImRo45 pic.twitter.com/msWmXrUJD4
— Mumbai Indians (@mipaltan) April 7, 2022
तसे पाहिले, तर मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिसाहातील सर्वात यशस्वी संघ असला, तरी संघाला अनेकदा सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपयश आल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक हंगाम असे गेले आहेत, ज्यामध्ये संघाने सुरुवातीला खूप खराब प्रदर्शन केले, पण शेवटी संघ प्लेऑफमध्ये किंवा अंतिम सामन्यापर्यंत गेला आहे. याच पार्श्वभूमीवर संघाची पुढची वाटचाल कशी असेल, याविषयी आत्ताच सांगणे कठीण आहे. मुंबईला त्यांचा पुढचा सामना आरसीबीसोबत खेळायचा आहे, जो १८ एप्रिल रोजी पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये आयोजित केला गेला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्यावेळी गांगुली म्हणालेला सचिनला बाद केलस, आता हे लोक तुला मारतील’, शोएब अख्तरचा खुलासा
‘रिषभ पंत एक चांगला कर्णधार’, एक-दोन नाही, तर तीन दिग्गजांकडून कौतुक