भारतीय संघाला २०११ विश्वचषकात (2011 world cup) विजय मिळवून देणारे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (gary kirsten) आयपीएल २०२२ मध्ये पुनरागमन करणार असल्याचे सांगितले जात आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामात नव्याने सामील होणाऱ्या अहमदाबाद फ्रेंचायझीच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त होऊ शकतात. कर्स्टनने यापूर्वी आयपीएमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि दिल्ली डेअरडेवल्स (सध्याचे नाव दिल्ली कॅपिटल्स) या दोन संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. भारताचा माजी वेगावन गोलंदाज आशीष नेहरा देखील अहमदाबाद फ्रेंचायझीच्या सपोर्ट स्टाफचा भाग बनण्याची शक्यता आहे.
क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन अहमदाबाद फ्रेंचायझीच्या मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत आहेत. असेही सांगितले गेले आहे की, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशीष नेहरा देखील या फ्रेंचायझीच्या सपोर्ट स्टाफचा भाग होईल. यापूर्वी हे दोघेही आरसीबीच्या सपोर्ट स्टाफचा भाग राहिले आहेत. कर्स्टनच्या मार्गदर्शनात २०११ साली भारताने आयसीसी विश्वचषकाचे जेतेपद जिंकले होते आणि यावेळी आशीष नेहरा भारतीय संघाचा सदस्य होत. एकंदरीत पाहता कर्स्टनच्या मार्गदर्शनात नेहरा खेळला आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार अशीही माहिती समोर आली आहे की, इंग्लंड संघाचा माजी क्रिकेटपटू विक्रम सोलंकी देखील अहमदाबाद फ्रेंचायझीच्या सपोर्ट स्टाफमध्ये सहभागी होऊ शकतात. तत्पूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की, अहमदाबाद फ्रेंचायझी भारतीय प्रशिक्षकांबाबद देखील विचार करत आहे. यामध्ये रवी शास्त्री, भरत अरूण आणि आर श्रीधर यांच्या समावेश होता. या तिघांचा नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघासोबतचा कार्यकाळ संपला होता.
दरम्यान, अहमदाबाद फ्रेंचायझीचे विकत घेणारी कंपनी सीवीसी कॅपिटल्सबाबत मागच्या काही दिवसांपासून वाद चालू आहे. सीवीसी कॅपिटल्सचे ऑनलाइन सट्टाबाजारीतल काही कंपनींशी संबंध असल्याचे समोर आल्यानंतर बीसीसीआयकडून सीवीसीला मान्यता मिळाली नव्हती. परंतू आता हा वाद मिटण्याच्या मार्गावर आहे आणि काही दिवसात बीसीसीआयकडून सीवीसीला मान्यता देखील मिळेल. एकदा बीसीसीआयकडून मान्यता मिळाल्यानंतर फ्रेंचायझीच्या सपोर्ट स्टाफविषयी निर्णय घेतला जाऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या –
रहस्य उलगडले, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत भारताचे ‘हे’ २ धुरंधर करणार ओपनिंग?
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
व्हिडिओ पाहा –