कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. शनिवारी (दि. १४ मे) पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर आयपीएल २०२२मधील ६१वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात रसेलने नाबाद ४९ धावांची वादळी खेळी केली. विशेष म्हणजे, या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने हैदराबाद संघाच्या ३ फलंदाजांना तंबूत धाडले. यामुळे कोलकाताला मोठा विजय मिळाला. कोलकाताने हैदराबादला ५४ धावांनी मात दिली. यावेळी आपल्या जबराट खेळीमुळे रसेलच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १७७ धावांचा डोंगर उभा केला होता. हे आव्हान हैदराबादच्या खेळाडूंना पार करता आले नाही. त्यांनी निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत फक्त १२३ धावाच केल्या. त्यामुळे कोलकाताचा ५४ धावांनी विजय झाला. यावेळी कोलकाताकडून आंद्रे रसेल (Andre Russell) याने केलेल्या ४९ धावांच्या खेळीमुळे त्याने आयपीएलमधील २००० धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे.
https://twitter.com/KKRiders/status/1525500403676090368
आंद्रे रसेलने आयपीएलमधील २००० धावा या केवळ ११२० चेंडूत पूर्ण केल्या. हा चेंडूंच्या बाबतीतील कोणत्याही फलंदाजाने केलेले सर्वोत्तम प्रदर्शन आहे. यापूर्वी हा विक्रम विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याच्या नावावर होता. त्याने सर्वात कमी १२११ चेंडूंचा सामना करत २००० धावा पूर्ण केल्या होत्या. रसेलने आतापर्यंत ९७ सामने खेळताना ८१ डावात ३०.७६च्या सरासरीने २०३० धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १० अर्धशतकेही झळकावली आहेत.
https://twitter.com/KKRiders/status/1525694965665259520
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
गोलंदाजी करताना सर्वोत्तम प्रदर्शन
आंद्रे रसेलने आयपीएलच्या चालू हंगामात १३ सामने खेळताना १३.७०च्या सरासरीने १७ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचे ५ धावा देत ४ विकेट्स ही त्याची आयपीएल हंगामातील सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी त्याने २०१६मध्ये सर्वाधिक १५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने आयपीएलमध्ये ८८ डावात गोलंदाजी करताना ८९ विकेट्स घेतल्या आहेत. संपूर्ण आयपीएलमध्ये त्याने १५ धावा देत ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. २ वेळा ४ आणि ५ वेळा विकेट्स घेण्याचा कारनामाही केला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आंद्रे रसेलचा हैदराबादविरुद्ध ‘अष्टपैलू’ खेळ, कोलकाताने ५४ धावांनी जिंकली रोमांचक लढत
मंकीगेट प्रकरणामुळे भारतीयांच्या डोक्यात गेला होता एँड्र्यू सायमंड्स, नक्की काय होतं ते प्रकरण?






