इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामाचा १८वा सामना राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने मुंबईला ७ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात आरसीबीचा युवा फलंदाज अनुज रावतने शनिवारी (दि. ०९ एप्रिल) आपल्या कारकीर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले आहे, त्याने या सामन्यात ६६ धावांची शानदार खेळी खेळली.
तो म्हणाला, त्याने जेव्हा खराब सुरुवात केली, तेव्हा त्याला त्याच्या वरिष्ठ खेळाडूंकडून चांगले समर्थन मिळाले. तो म्हणाला, “विजयी सामन्यात धावा करून चांगले वाटले. फक्त मी प्रक्रियेचे पालन करत होतो. मी अन्य सामन्यात चांगली खेळी खेळू शकलो नाही, परंतु शनिवारी चांगली खेळी खेळली. अपेक्षा आहे की, अशीच कामगिरी पुढील सामन्यात देखील करेल. आरसीबी संघाने मला विश्वास दिला आहे, परंतु त्यांनी माझे तेव्हा सुद्धा समर्थन केले. जेव्हा मी सामना समाप्त करू शकत नव्हतो. मला विराट भैय्या आणि फाफसोबत मजा येत आहे.”
आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) म्हणाला, “मी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनुजसोबत संवाद साधला. त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. आम्ही दोघांनी खूप संवाद साधला. त्याला त्याची क्षमता आणि शैलीचा वापर सामन्यांमध्ये करता यावा. ज्या पद्धतीने तो शनिवारी खेळत होता, ते शानदार आहे. ज्या पद्धतीने तो खेळ पुढे घेऊन जात आहे, ते शानदार आहे. हे त्याला विशेष बनवते. आमच्यासाठी हा शानदार क्षण होता. तो भविष्यातील उत्कृष्ठ खेळाडू आहे.”
मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या १५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युवा फलंदाज अनुजने ४७ चेंडूत ६ चौकारांच्या आणि २ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. रावतच्या शानदार खेळीच्या आधारे संघाने या लीगमधील तिसरा विजय मिळवला आहे. अनुज रावतची सुरुवात चांगली झाली नाही. त्याने पंजाब किंग्सविरुद्ध २१ तर कोलकाताविरुद्ध शून्य आणि राजस्थान राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध २६धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहली खरंच बाद होता का? जाणून घ्या काय सांगतो क्रिकेटमधील ‘हा’ नियम
किती आले, किती गेले; पण दिल्लीकडून सेहवागनंतर फक्त पृथ्वी शॉच करू शकला ‘हा’ भीमपराक्रम
रियान परागला घाबरला राजस्थान रॉयल्सचा परदेशी खेळाडू, केली थेट निवृत्तीची घोषणा!