रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा वेगवान गोलंदाज आकाश दीपचा आयपीएलपर्यंतचा प्रवास सोपा राहिलेला नाहीये. आरसीबीने त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासाविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून आकाशचा संघर्ष जगासमोर आला. चाहत्यांकडून या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स येत आहेत. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील आकाशचा प्रवास ऐकून भावूक झाली आहे. अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
आकाश दीप (Akash Deep) मूळचा बिहारचा आहे. सुरुवातीला तो आरसीबाचा नेट गोलंदाज होता आणि यावर्षी त्याला संघासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे. आकाशला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहावे लागले. आरसीबीने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केलेल्या व्हिडिओत आकाशने क्रिकेट खेळण्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि कोरोना महामारीच्या काळात जवळची माणसे गेल्याची माहिती दिली.
https://www.instagram.com/p/CcMhlfQjLAk/?utm_source=ig_embed&ig_rid=7d6cf5c3-28ca-41ce-b2ce-7fb549671e5f
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आकाशने त्यांचे वडील आणि भावाला २०१५ साली गमावले होते. या दोन महत्वाच्या वक्तींची साथ सुटल्यानंतर आकाशने त्याचे पूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले, पण त्याचा संघर्ष एवढ्यावर थांबला नाही. मागच्या वर्षी भारतात जेव्हा कोरोना विषाणूने थैमान माजवले होते, तेव्हा त्याची काकू आणि वहिनी यांची तब्येत बिघडली. याच काळात या दोघींनी स्वतःचे प्राण गमावले. सोबतच त्याच्या आईची तब्येत देखील बिघडली होती, पण आरसीबी फ्रँचायझीची मदत मिळाल्यामुळे त्या सध्या सुखरूप आहेत. कुटुंबातील सदस्यांचे अशाप्रकारे अचानक जाण्यामुळे आकाशला नक्कीच मोठे धक्के बसले, पण तरीही त्याने क्रिकेटमध्ये खंड पडू दिला नाही.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये आकाशचा व्हिडिओ शेअर करत खास संदेश लिहिला आहे. अनुष्काने लिहिले की, “सर्व अडचणींविरोधात ही कथा मनाला स्पर्श करणारी आहे.”
आयपीएल २०२२च्या पहिल्या सामन्यापासून आकाश दीपला आरसीबीने संधी दिली आहे. पहिल्या सामन्यात त्याने पंजाब किंग्जविरुद्ध ३८ धावा खर्च करून १ विकेट मिळवली होती. त्यानंतर केकेआरविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ४५ धावा देऊन ३ विकेट्स मिळवल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात आकाशने राजस्थान रॉयल्सची एकही विकेट घेतली नाही. त्यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध १ आणि सीएसकेविरुद्ध शून्य विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विरोधी संघांच्या ‘या’ फंड्यामुळे राशिद खानला मिळत नाहीयेत जास्त विकेट्स; स्वत:च सांगितले कारण
‘आरसीबी जिंकत नाही, तोपर्यंत लग्नच करणार नाही’, पाहा कोण आहे ‘ती’ तरुणी
मुंबईच्या ताफ्यातील युवा खेळाडूंना बूम बूम बुमराहचा मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘आता इतिहास विसरा…’