आयपीएल २०२२मध्ये पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ त्यांच्या पहिल्या विजयासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यांनी आतापर्यंत ६ सामने खेळले असून अद्याप त्यांना एकाही सामन्यात विजयाची चव चाखता आलेली नाही. अशात गुणतालिकेत तळाशी असलेला मुंबई संघ गुरूवारी (२१ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे. या ‘एल क्लासिको’ सामन्यापूर्वी मास्टर ब्लास्टर आणि मुंबई संघाचा मार्गदर्शक सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर चर्चेत आला आहे.
वेगवान गोलंदाज असलेला अर्जुन (Arjun Tendulkar) गतवर्षीपासून मुंबई संघाचा (Mumbai Indians) भाग आहे. मात्र अद्याप त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळालेली नाही. परंतु नेट्समध्ये सातत्याने दमदार गोलंदाजी प्रदर्शन करत तो आयपीएलप्रेमींचे लक्ष वेधताना दिसतोय.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
चेन्नईविरुद्धच्या (CSK vs MI) सामन्यापूर्वीही त्याचा सराव सत्रातील एक व्हिडिओ पुढे आला आहे. या व्हिडिओ तो चक्क मुंबई संघाचा प्रमुख सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan) याची बत्ती गुल (Arjun Tendulkar Clean Bold Ishan Kishan) करताना दिसत आहे. मुंबई संघाने शेअर केलेल्या या व्हिडिओत दिसते की, अर्जुन अतिशय भेदक यॉर्कर टाकतो, जो इशानला चकवत थेट यष्टीला जाऊन लागतो. मुंबई संघाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जर तुमचे नाव अर्जुन असेल तर तुम्ही चुकवू शकत नाही.’
सरावादरम्यान अर्जुनने इशानला त्रिफळाचीत केल्याचे पाहून चाहते इरेला पेटले आहेत. मुंबईच्या अपयशी प्रदर्शनानंतर सातत्याने अर्जुनला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्याच्या मागणीने आणखीनच जोर धरला आहे. अनेकांनी या व्हिडिओखाली अर्जुनचे कौतुक करत त्याला कमीत कमी पदार्पणाची संधी देऊन पाहण्याचा सल्ला दिला आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1516805137913704451?s=20&t=ulOweHGqGzPYf2L2301toA
मुंबई फ्रँचायझीने दिले होते संकेत
दरम्यान लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई संघाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी अर्जुनचा फोटो जोडत लिहिले होते की, मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्यासाठी आमच्या डोक्यात असलेली व्यक्ती. या पोस्टनंतर अनेकांना वाटले होते की, अर्जुनला लखनऊविरुद्ध खेळवले जाईल. परंतु त्याला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.
मुंबईने २२ वर्षीय अर्जुनला मेगा लिलावात ३० लाख रुपयांना विकत घेतले होते. तो आयपीएल २०२१ मध्येही मुंबई संघाचा भाग होता, परंतु दुखापतीमुळे तो आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर झाला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा मैदानात घोंगावलं होतं पोलार्ड नावाचं वादळ, श्रीलंकेविरुद्ध एकाच षटकात ठोकले होते सलग ६ षटकार
चेन्नईच्या सलामीवीराने लग्नासाठी सोडला बायोबबल, जाणून घ्या कधी होणार पुनरागमन






