बीसीसीआयने आयपीएल २०२२ (IPL 2022) पूर्वी मेगा लिलाव (mega auction) आयोजित केला. पुढच्या आयपीएल हंगामात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रेंचायझी सामील होणार आहेत. त्यामुळे स्पर्धेतील संघांची संख्या आठ ऐवजी दहा झाली आहे. अशात मेगा लिलावात संघांमध्ये चांगल्या खेळाडूंसाठी चुरशीची लढाई पाहायला मिळाली. भारताचा अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया (Rahul Tewatia) याला अपेक्षेपेक्षा मोठी रक्कम मिळाली आहे. गुजरात टायटन्सने त्याला संघात सामील केले.
राहुल तेवतिया एक एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे, ज्याने आतापर्यंत आंतरारष्ट्रीय पदार्पण केले नाहीय. परंतु २०१४ पासून तो आयपीएमध्ये खेळत आहे आणि त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. राहुल आतापर्यंत ज्या ज्या संघासाठी खेळला आहे, त्यांच्यासाठी त्याने एका फिनिशरची भूमिका पार पाडली आहे. अशात गुजरात टायटन्ससाठीही तो फिनिशरच्याच भूमिकेत दिसू शकतो. कर्णधार हार्दिक पंड्या आणि तो मिळून शेवटच्या षटकात वेगाने धावा बनवू शकतात. तसेच राशिद खानसोबत तो त्याच्या फिरकी गोलंदाजीची कमालही दाखवू शकतो. गुजरात टायटन्सने राहुलला संघात सामील करण्यासाठी ९ कोटी रुपये मोजले आहेत.
यापूर्वी राहुल राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज या संघांसाठी खेळला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी २०२० मध्ये खेळताना त्याने पाच चेंडूत पाच षटकार मारण्याचा जबरदस्त विक्रम केला आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत ४८ सामने खेळले आहेत आणि यामध्ये ३२ विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यांमध्ये राहुलने एकूण ५१२ धावाही केल्या आहेत.
दरम्यान, राहुल तेवतिया आता आयपीएल लिलावाच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. त्याला गुजरात टायटन्सने ९ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. त्याव्यतिरिक्त अनकॅप्ड खेळाडू शाहरुख खानलाही पंजाब किंग्जने ९ कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले. अनकॅप्ड खेळाडूंच्या इतिहासातील आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे आवेश खान. आवेश खानला लखनऊ सुपर जायंट्सने १० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
IPL AUCTION| असा राहिला ‘मार्की’ खेळाडूंसाठी मेगा लिलाव; कोणी महाग कोणी स्वस्त
IPL लिलावात लखनऊचा नवाबी अंदाज! आवेश खानवर लावली विक्रमी बोली, ठरला ऐतिहासिक खेळाडू
‘कोहलीचा भिडू’ राजस्थानात जाऊन आहे खुश, व्हिडिओ शेअर करत पडिक्कलने दिलीय अशी प्रतिक्रिया