---Advertisement---

….आणि चारू शर्मांनी सुंदरची बोली वाढवली ५० लाखांनी! वाचा काय घडले लिलावावेळी

On: बुधवार, फेब्रुवारी 16, 2022 6:26 PM
---Advertisement---

आयपीएल २०२२ (IPL 2022 mega auction) च्या मेगा लिलावात खेळाडूंवर पैशाचा पाऊस पडला. यावर्षी लिलावात एकूण २०४ खेळाडूंवर बोली लागली आणि ते वेगवेगळ्या फ्रेंचायझींमध्ये सहभागी झाले. अनुभवी ऑक्शनर ह्यू एडमीड्स यांची लिलावादरम्यान प्रकृती बिघडल्यानंतर चारू शर्मा यांनी ऑक्शनरची भूमिका पार पाडली. चारू शर्मांनी कोणत्याही पूर्वतयारीशिवाय लिलाव चांगल्या प्रकारे पार पाडला. परंतु त्यांच्याकडून लिलावादरम्यान काही मोठ्या चुकाही झाल्या. अष्टपैलू वॉशिंगटन सुंदरच्या लिलावावेळी त्यांच्याकडून ही चूक झाली.

वॉशिंगटन सुंदरची बोली जेव्हा ६.५० कोटींवर पोहोचली होती, तेव्हा गुजरात टायटन्सने त्याला ६.७५ कोटी रुपयांची बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर ७ कोटी रुपयांची बोली लावली. अशात ऑक्शनर चारू शर्मा यांनी ७.२५ कोटी रुपयांसाठी विचारणा केली पाहिजे होती, परंतु त्यांनी थेट ७.७५ कोटी रुपायंसाठी विचारणा केले. चारू शर्मांनी सुंदरची बोली तब्बल ५० लाख रुपयांनी वाढवली. त्यांची ही चूक लिलावावेळी शक्यतो कोणाच्या लक्षात आली नसावी. पण त्याचा व्हिडिओ मात्र आता व्हायरल होत आहे.

८.७५ कोटींमध्ये विकला गेला वॉशिंगटन सुंदर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---