आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी एमएस धीनीने चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कर्णधारपदाची कमान रवींद्र जडेजाला सोपवली आहे. सीएसकेने आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी रवींद्र जडेजाला १६ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते, तर एमएस धोनीला रिटेन करण्यासाठी सीएसकेने १२ कोटी खर्च केले होते. चला तर जाणून घेऊया संघात दिग्गज उपस्थित असताना धोनीनंतर जडेजा एकमेव खेळाडू का ठरला, जो सीएसकेचे नेतृत्व करू शकतो.
फलंदाजी – रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यामध्ये आक्रमक फलंदाजी आणि मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी ट्रॉफी स्पर्धेत जडेजाच्या नावावर दोन तिहेरी शतक आहेत. एवढेच नाही, तर एकदिसीय आणि टी२० क्रिकेटमध्ये जडेजा परिस्थितीनुसार फलंदाजी करू शकतो. टी२० क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १२५ च्या आसपास आहे. आयपीएलमध्ये त्याने १२८ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
गोलंदाजी – रवींद्र जडेजा भारताचा एक जबरदस्त डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. तो स्वतःची षटके झटपट टाकून मोकळा होऊ शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २४२ विकेट्स आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८८ आणि टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये त्याने ४८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच २०० आयपीएल सामन्यांमध्ये त्याने १२७ विकेट्स घेतल्या आहेत. जडेजा भारतीय खेळपट्टीवर अधिक घातक गोलंदाज बनतो.
क्षेत्ररक्षण – भारतीय दिग्गज युवराज सिंग एके काळी भाराताचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. जडेजाही युवराजसारखे क्षेत्ररक्षण करू शकतो. जडेजा कोणत्याही जागेवर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करू शकतो. जडेजा त्या निवडक खेळाडूंमधील एक आहे, ज्यांच्या नावावर टी२० क्रिकेटमध्ये १०० पेक्षा अधिक झेल नोंदवल्या गेल्या आहेत. त्याने २७६ टी२० सामन्यांमध्ये १०७ झेल घेतल्या आहेत.
वयाचा फायदा – सीएसकेसाठी आतापर्यंत एमएस धोनी आणि सुरेश रैना या दोन भारतीय दिग्गजांनी कर्णधाराची भूमिका पार पाडली आहे. सध्या सीएसकेकडे मोईन अली आणि ड्वेन ब्रावो हे मोठे खेळाडू आहेत, पण तरीही संघाने भारतीय खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. जडेजा सध्या ३३ वर्षांचा आहे. मोईन अली आणि ब्रावोपेक्षा तो लहान असल्यामुळे पुढच्या बऱ्याच दिवसांपर्यंत सीएसकेचे नेतृत्व करू शकतो.
संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध – जडेजा संपूर्ण हंगामात सीएसकेसाठी उपलब्ध असेल. विदेशी खेळाडूंचे मात्र तसे नाही. तो बीसीसीआयसोबत करारबद्ध खेळाडू आहे. ज्या खेळाडूंचा बीसीसीआयसोबत करार आहे, ते खेळाडू आयपीएलदरम्यान दुसऱ्या कोणत्याही टी-२० लीगमध्ये खेळू शकत नाहीत. जडेजाने आयपीएलच्या माध्यमातून आतापर्यंत ९३ कोटी रुपये कमावले आहेत. तसेच जाहिराती आणि बीसीसीआयशी करार केल्यामुळेही त्याने कोट्यावधी रुपये कमावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सलग ४ वनडे विश्वचषकात ४ शतके, न्यूझीलंडच्या सुझी बेट्सचा कोणत्या पुरुष क्रिकेटरलाही न जमलेला पराक्रम
पाकिस्तानच्या पराभवाने भारताला फायदा, कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत गाठला ‘हा’ क्रमांक
युवा खेळाडूंबाबत काय बोलून गेला दिल्लीचा कर्णधार रिषभ? म्हणे, ‘२ महिन्यात कोणाला सुपरहिरो नाही…’