---Advertisement---

‘मी तुला सांगितलेलं नको खेळू, तुझ्यामुळेच आरसीबी हारली, आता निवृत्ती घे’, विराटवर भडकला बॉलिवूड अभिनेता

On: शनिवार, मे 28, 2022 10:50 PM
Virat-Kohli-RCB
---Advertisement---

विराट कोहली याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर इंडियन प्रीमियर लीग २०२२ मधून शुक्रवारी (२७ मे) बाहेर पडला. क्लालिफायर दोनमध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांना मात दिली आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. विराट या सामन्यात पुन्हा एकदा मोठी खेळी करू शकला नाही. चालू हंगामात विराटचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान याने एक वादग्रस्त ट्वीट केले आहे.

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान (Kamal R Khan) हा केआरके नावाने ओळखला जातो आणि तो त्याच्या वादग्रस्त वक्तव्य आणि सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीत चर्चेत असतो. आता विराट कोहली (Virat Kohli) विषयी केलेल्या एका ट्वीटमुळे केआरके पुन्हा एकदा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी त्याने विराटला लवकरात-लवकर क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे. विराटने आयपीएल २०२२ मध्ये खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये ३४१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी २२.७३ धावा राहिली आहे.

केआरकेने केलेल्या ट्वीटमध्ये त्याने विराटविषयी लिहिले की, “प्रिय विराट कोहली, मी तुला शेवटच्या सामन्यात खेळू नको म्हटलो होतो, पण तू माझे म्हणणे ऐकले नाही. तुझ्यामुळेच आरसीबी संघ आयपीएल २०२२मधून बाहेर झाला आहे. आशा आहे की, तू लवकरच क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घोषित करशील.” केआरकेने अजून एका ट्वीटमध्ये असेही लिहिले की, “जेव्हा मी ही भविष्यवाणी केली, तेव्हा लोकं माझ्यावर भडकले. आज माझी भविष्यवाणी शंभर टक्के बरोबर ठरली आहे, कारण मला माहीत आहे की, विराट आरसीबीचे दुर्दैव आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---