नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022)चा मेगा लिलाव (Mega Auction) पार पडला आहे. या २ दिवसीय लिलावात १० फ्रँचायझींनी खेळाडूंवर ५५१ कोटी खर्च केले आहेत. सहभागी ६०० खेळाडूंपैकी एकूण २०४ खेळाडूंवर बोली लागल्या असून त्यातील ६७ खेळाडू हे परदेशी आहेत. आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ, चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)नेही त्यांच्या बऱ्याचशा जुन्या खेळाडूंना पुन्हा संघात सामील केले आहे. तसेच काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. यातीलच एक नाव म्हणजे, श्रीलंकेचा फिरकीपटू महीश तिक्षाणा (Maheesh Theekshana). या श्रीलंकन खेळाडूला विकत घेतल्यामुळे चेन्नई संघ मात्र अडचणीत सापडला आहे.
२१ वर्षीय तिक्षाणाची लिलावातील मूळ किंमत ५० लाख रुपये होती. त्याला विकत घेण्यासाठी चेन्नईव्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्सनेही रस दाखवला होता. परंतु चेन्नईने ७० लाख रुपये मोजत त्याला आपल्या ताफ्यात सामाविष्ट केले आहे. मात्र चेन्नईच्या या निर्णयावरून चाहते खूप संतापले आहेत.
का नाराज आहेत चाहते?
श्रीलंकेचा क्रिकेटपटू तिक्षाणा हा सिंहली पार्श्वभूमीतून आला आहे. याचमुळे चेन्नईचे तमिळ प्रशंक्षक नाराज झाले असल्याचे दिसत आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, सिंहली पार्श्वभूमी असणाऱ्या क्रिकेटपटूला तमिळ लोकांचे स्वामित्त्व असलेल्या आयपीएल संघात जागा मिळायला पाहिजे नव्हती. त्यामुळे नाराज चाहत्यांनी ट्वीटरवर संताप व्यक्त केला असून सध्या ट्वीटरवर #Boycott_ChennaiSuperkings ट्रेंडमध्ये आहे.
https://twitter.com/elonmuskssss/status/1493230266101362689?s=20&t=ACG5Diu5zA7l6Gg_Tm6_Ig
உலகம் முழுக்க இலங்கை கிரிக்கெட் எனும் இனப்படுகொலை ஆயுதத்தை எதிர்த்து போராட தமிழகமக்களின் காசின் உழைப்பவர்கள் அதற்கு உடந்தையா.@ChennaiIPL #Boycott_ChennaiSuperKings pic.twitter.com/sjuNIoFrK9
— தலைவரின் சிந்தனை (@leadersinthanai) February 13, 2022
Remove the player from the franchise or Remove the word "Chennai" from your franchise name.
If you feel this boy is more important for you than the emotions of Tamils, you don't need to represent Chennai in IPL. @ChennaiIPL #Boycott_ChennaiSuperKings pic.twitter.com/SpFpU6B3To— பிரியக்குமார் அருள்நாதன் (@ProudTamizhan1) February 14, 2022
एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यात बंदी आहे. कारण ते भारताच्या शत्रू देशाकडून खेळणारे खेळाडू आहेत. परंतु तमिळ लोकांचा शत्रूदेश असलेला श्रीलंका, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या गुन्ह्यांना मिटवण्यासाठी अशा खेळांचा वापर करतो. इतरांची पर्वा नाही. पण आता खुद्द चेन्नई सुपर किंग्जने श्रीलंकन खेळाडूला घेतले आहे! याउलट त्यांच्या संघात एकही तमिळ खेळाडू नाही!.’
#Boycott_ChennaiSuperKings
Pakistanis are banned from IPL cause they are (north)”India’s enemies”. but Tamil’s enemies the SL state uses these sports to whitewash its crimes in international stage ,,and idiots don’t care! Now taking in a player even inside CSK! While no Tamils!— செய்சத் (ஆ) (@Jeya2002) February 14, 2022
चेन्नई सुपर किंग –
उर्वरित किंमत – २ कोटी ९५ लाख
संघातील खेळाडू – २५ (परदेशी ८)
संघ – रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, दीपक चाहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, ड्वेन ब्राव्हो, डेवॉन कॉनवे, शुभ्रांशू सेनापती, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महिश तिक्षणा, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, प्रशांत सोळंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! भारताला तिसरा धक्का, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर टी२० मालिकेतून बाहेर; ‘हे’ आहे कारण
Valentines Day Special : विदेशी मुलींना जीवनसाथी म्हणून निवडलेले ३ भारतीय क्रिकेटपटू
यूपी योद्धांपुढे दबंग दिल्लीची शरणागती, ४४-२८च्या मोठ्या फरकाने सामना खिशात