इंडियन प्रीमियर लीग ही शनिवारपासून (२६ मार्च) सुरू होत आहे. आयपीएलचे सर्व सामने पुणे आणि मुंबईच्या ४ स्टेडिअममध्ये खेळवले जाणार आहेत. या साठी मुंबईतील तीन आणि पुण्यातील २ मैदान निवडण्यात आले आहे. ७० सामन्यांपैकी ५५ सामने मुंबईच्या लाल मातीचा प्रयोग केल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि नवी मुंबईत डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये, तर १५ सामने पुण्याच्या काळ्या मातीचा प्रयोग केल्या जाणाऱ्या एमसीए स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. या लेखात आपण या स्टेडियमबद्दल जाणून घेणार आहोत.
वानखेडे स्टेडियम
वानखेडे स्टेडियम (Wankhede stadium) मैदानावर मनगटाचा वापर करून आणि बोटांचा वापर करून फिरकी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये मोठा फरक जाणवतो. फिरकी गोलंदाज प्रत्येक ३४ चेंडूंवर ९.१५च्या इकॉनॉमीने विकेट घेतात, तर बोटांचा वापर करून फिरकी गोलंदाजांसाठी हेच आकडे आहेत. आयपीएल २०२१ दरम्यान वेगवान गोलंदाजांनी ३१ विकेट्स घेतल्या आणि पॉवरप्लेमध्ये फिरकीपटूंनी फक्त एक विकेट घेतली. माजी कसोटीपटू आशिष नेहरा आणि आरसीबीचा हर्षल पटेल या दोघांचा असा विश्वास आहे की, अशा खेळपट्टीवर चांगली उसळी मिळते. आक्रमक वेगवान गोलंदाज नवीन चेंडूचा फायदा घेत विरोधी संघाला बॅकफूटवर ठेवण्यासाठी पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेऊ शकतील, असे नेहराचे म्हणणे आहे.
ब्रेबॉर्न स्टेडियम
ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne stadium) २०१५ नंतर स्पर्धात्मक सामने न झाल्यामुळे आकडेवारीच्या आधारावर जास्त काही सांगता येणार नाही. येथे लाल मातीचा वापर केला जातो आणि अशा परिस्थितीत फलंदाजीसाठी अनुकूल परिस्थिती आढळते. हर्षल म्हणाला की, “लाल मातीच्या खेळपट्ट्यांवर चेंडू जास्त दूर जातो आणि त्याचा फायदा आणि तोटाही होऊ शकतो. मला वाटते की, स्पर्धेच्या दुसऱ्या भागात येथे आणखी वळणे येऊ शकतात.” ब्रेबॉर्नचे मैदान वानखेडेपेक्षा खूप मोठे आहे. येथे फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल.
Excitement Levels Going 🆙! 🙌
We are inching closer to the start of #TATAIPL 2022! ⏳ pic.twitter.com/Yg87M23JNM
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2022
डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी
डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी या मैदानावर २०११मध्ये शेवटचा टी२० सामना खेळला गेला होता. या स्टेडियमचा वापर कित्येकदा फुटबॉल सामने आयोजित करण्यासाठी केला जातो. अलीकडच्या काळात येथे पुरेसे आकडे नाहीत. मुंबईतील इतर मैदानांपेक्षा या मैदानाच्या सीमारेषा खूप मोठ्या आहेत. या मैदानात लाल मातीचा वापर केला जातो.
एमसीए स्टेडियम, पुणे
रात्रीच्या सामन्यांमध्ये जेथे वेगवान गोलंदाजांचा स्ट्राईक रेट ९.२२ आणि २२ चेंडू असतात, फिरकीपटू प्रत्येक १९ चेंडूंवर ८.१ धावा खर्च करून विकेट्स घेतात. पुण्यात एक काळ असा सुद्धा होता की, आयपीएलचे सामने नियमित खेळले जायचे, पण २०१८ नंतर २०२० मध्ये येथे फक्त एकच आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला आहे. येथे काळ्या मातीपासून बनवलेल्या खेळपट्ट्या वापरल्या जातात आणि मुंबईच्या मैदानांपेक्षा इथल्या सीमारेषाही लहान आहेत. येथे फिरकी गोलंदाज प्रत्येक २३ चेंडूत ६.७८च्या सरासरीने विकेट्स घेतात. कदाचित या मैदानावर फिरकीपटूंचा प्रभाव महत्त्वाचा ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
म्हणून आयपीएल भारीये.! रविंद्र जडेजाचा संघर्ष पाहून तु्म्हीही म्हणाल, ‘इथे कष्टाचं फळ मिळतंच’
आनंदाची बातमी! आयपीएलचा थरार आता मराठीतूनही मिळणार अनुभवायला