एमएस धोनीच्या (ms dhoni) नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) संघ आतापर्यंत चार वेळा आयपीएल (IPL) जिंकला आहे. आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वीच सीएसके संघाने नवीन विक्रम करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी (२८ जानेवारी) सीएसके भारतातील पहिला स्पोर्ट्स युनिकॉर्न बनला आहे. सीएसकेचे बाजार मूल्य (csk market value) सध्या ७,६०० करोड रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. ग्रे मार्केटमध्ये त्यांच्या शेअर्स सध्या २१० ते २२५ किंमतीत ट्रेड करत आहेत.
एवढेच नाही तर सीएसकेचे सध्येचे बाजार मूल्य त्यांची मुळ कंपनी इंडिया सिमेंटपेक्षा जास्त झाले आहेत. शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना इंडिया सिमेंटचे बाजार मूल्य ६,८६९ करोड रुपये होते, तर सीएसके मात्र ७,६०० करोड च्या आसपास होतेए. मागच्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकल्यामुळे सीएसकेच्या शेअर्सच्या किंमतीत चांगली वाढ झाली होती. आयपीएल २०२२ साठी संजीव गोयंकांच्या आरपीएसजी समूहाने ७००० करोड रुपयांमध्ये लखनऊ फ्रेंचायझी विकत घेतली. तसेच, सीवीसी कॅपिटल्सने अहमदाबाद फ्रेंचायझीसाठी ५,६२५ करोड रुपये खर्च केले. या दोन नवीन फ्रेंचायझींमुळेही सीएसकेच्या शेअरची किंमत वाढली.