कॅरेबियन बेटांवर सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना गतविजेत्या बांगलादेशविरुद्ध झाला. पण त्याआधीच्या तयारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
बीसीसीआयने शनिवारी (२९ जानेवारी) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने युवा भारतीय फलंदाजांना थ्रोडाऊन करत सराव दिला. या व्हिडिओला कॅप्शन दिले की, ‘व्हेरी व्हेरी स्पेशल तयारी! भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणच्या थ्रोडाऊनचा सामना करत तयारी करत आहेत.’
याबरोबरच आयसीसीने देखील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात लक्ष्मण भारतीय खेळाडूंना फलंदाजीबद्दल खास सल्ले देताना दिसत आहे. लक्ष्मण १९ वर्षांखालील भारतीय संघासह वेस्ट इंडिजला आला आहे. तो भारतीय खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला मदत करत आहे.
काहीदिवसांपूर्वीच लक्ष्मणने बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपदाचा कार्यभार स्विकारला आहे. त्याने राहुल द्रविडच्या ऐवजी ही जबाबदारी हाती घेतली आहे. लक्ष्मणपूर्वी द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदी होता. पण द्रविड वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक झाल्याने हे पद रिक्त झाले होते. पण, नंतर लक्ष्मणने ही जबाबदारी सांभाळली.
???? ???????????????? ???????????????? ???????????????????????????? ????????????????????????????????????????????! ???? ???? #BoysInBlue gear up for the #U19CWC 2022 #INDvBAN quarterfinal with some throwdowns from the legendary @VVSLaxman281. ???? ???? pic.twitter.com/kPp51Goof4
— BCCI (@BCCI) January 29, 2022
https://www.instagram.com/reel/CZTzzkbFmrs/?utm_medium=copy_link
भारतीय संघ साखळी फेरीत अपराजित
१९ वर्षांखालील भारतीय संघाने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४५ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध १७४ धावांनी आणि युगांडा विरुद्ध ३२६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे भारताने अपराजित राहात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
भारताचे ५ खेळाडू कोरोना निगेटिव्ह
भारताचा कर्णधार यश धूल (Yash Dhull), उपकर्णधार शेख रशीद, आराध्य यादव, वासु वत्स आणि सिद्धार्थ यादव या भारतीय खेळाडूंचे कोरोना अहवाल साखळी फेरीदरम्यान पॉझिटिव्ह आला होता. मात्र, आता हे खेळाडू कोरोनाच्या संकटातून बाहेर आले असून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यापूर्वी या सर्वांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
पण, एकीकडे हे खेळाडू कोरोनाला हरवून संघात परतले आहेत, तर प्रभारी कर्णधारपद भूषवलेला निशांत सिंधू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार युगांडाबरोबरील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर सिंधूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे तो बाद फेरीतून बाहेर झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शाहीन आफ्रिदीने ‘ड्रीम हॅट्रीक’ साठी घेतली ‘या’ तीन भारतीय खेळाडूंची नावे; म्हणाला…
सीएसकेची शेअर बाजारातही सत्ता! गुंतवणूकदारांची झाली चांदीच-चांदी
हर्षा भोगलेंचा दावा; ‘हे’ दोन युवा फलंदाजच गाजवणार आयपीएलचा बाजार; जाणून घ्या नावे
व्हिडिओ पाहा – २०१९ विश्वचषक सेमीफायनलनंतर काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये






