---Advertisement---

IPL2022| चेन्नई वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

---Advertisement---

आयपीएल २०२२ च्या ७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांनी या हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करला आहे. परंतु दोन्ही संघांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात त्यांची मध्यक्रमातील मजबूती सिद्ध केली होती. लखनऊसाठी दीपक हुड्डा आणि आयुष बदोनीने पहिल्या सामन्यात महत्वाची खेळी केली होती, तर दुसरीकडे सीएसकेसाठी त्यांचा माजी कर्णधार एमएस धोनी याने केकेआरविरुद्ध अर्धशतक ठोकले होते.

लखनऊच्या संघाला पुन्हा एकदा जेसन होल्डरविना मैदानात उतरावे लागेल. तर दुसरीकडे सीएसकेसाठी त्यांचा महत्वाचा अष्टपैलू मोईन अली उपलब्ध असणार आहे. व्हिसा वेळेत न मिळाल्यामुळे तो पहिल्या सामन्यासाठी उपस्थित राहू शकला नव्हता. मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात मोईन अलीने पावर प्लेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. यादरम्यान त्याने टाकलेल्या ११ षटकांमध्ये ५.७ च्या इकोनॉमीने ५ विकेट्स घेतल्या होत्या. सीएसके मोईन अलीचा वापर लखनऊचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकविरुद्ध करू शकते. डी कॉकने मोईनविरुद्ध ३८ चेंडूत ५३ धावा केल्या होत्या. तसेच मोईनने त्याला ८ पैकी ४ टी-२० डावांमध्ये बाद केले आहे.

असा बनवू शकता स्वतःचा ड्रीम ११ संघ –

कर्णधार: केएल राहुल
उपकर्णधार: मोईन अली
यष्टीरक्षक: क्विंटन डी कॉक
फलंदाज: अंबाती रायडू, दीपक हुड्डा, ऋतुराज गायकवाड
अष्टपैलू: रवींद्र जडेजा, मोईन अली, कृणाल पंड्या
गोलंदाज: ड्वेन ब्रावो, आवेश खान, रवि बिश्‍नोई

लखनऊ सुपर जायंट्स यातून निवडणार त्यांची प्लेइंग इलेव्हन –

केएल राहुल (कर्णधार), रवि बिश्नोई, दीपक हुड्डा, क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), मार्कस स्टोइनिस, जेसन होल्डर, मनीष पांडे, क्रुणाल पंडया, मार्क वुड, आवेश खान, अंकित सिंह राजपूत,  दुष्मांथा चमीरा, शाहबाज नदीम, कृष्णाप्पा गौतम, मनन वोहरा, मोहसिन खान, काइल मायर्स, कर्ण शर्मा, इविन लुईस, आयुष बदोनी, और मयंक यादव.

चेन्नई सुपर किंग्स यातून निवडणार त्यांची प्लेइंग इलेव्हन –

रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, डेवोन कॉन्वे, ड्वेन ब्रावो, क्रिस जॉर्डन, दीपक चाहर, शिवम दुबे,  सिमरजीत सिंह, ड्वेन प्रिटोरियस, एडम मिल्ने, राजवर्धन हंगरगेकर, प्रशांत सोलंकी, मिचेल सॅटनर, महेश तीक्षणा, मुकेश चौधरी, शुभांशु सेनापति, केएम आसिफ, तुषार देशपांडे, एन. जगदीशन, के. भगत वर्मा, सी. हरि निशांत.

महत्वाच्या बातम्या –

कर्णधार डू प्लेसिसने कार्तिकला म्हटले धोनीसारखे ‘कूल’, उधळली स्तुतीसुमने; वाचा स्टेटमेंट

रहाणेच्या मोठ्या विक्रमावर सिराजने फेरले पाणी; धोनी, विराटच्या क्लबमध्ये सामील होण्याची होती संधी

जंटलमन हॅश- दारुच्या ब्रँडचा लोगो जर्सीवर न लावल्यामुळे लाखो रुपये गमावलेल्या हशिम आमलाची गोष्ट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---