---Advertisement---

लॅपटॉप नाही, कागद-पेनाने बनवली रणनीती; कोच नेहराने नवख्या गुजरातला असे बनवले ‘चँपियन’

Ashish-Nehra
---Advertisement---

आयपीएल २०२२ मध्ये नव्याने सहभागी झालेले संघ गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनी जबरदस्त प्रदर्शन केले आहे. गुजरात टायटन्स हंगामातील प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. संघाला पहिल्या हंगामातच प्लेऑफमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी कर्णधार हार्दिक पंड्या आणि संघातील इतर खेळाडूंनी जेवढी मेहनत घेतली, तेवढीच मेहनत मुख्य प्रशिक्षक आशीष नेहराने देखील घेतली.

प्रशिक्षक आशीष नेहरा (Ashish Nehra) याने संघासाठी मेगा लिलावात खेळाडूंची निवड करण्यापासून संघाला प्लऑफमध्ये स्थान मिळेपर्यंत महत्वाचे योगदान राहिले आहे. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणाऱ्या नेहरा यावेळी मुख्य प्रशिक्षक आहे. ही जबाबदारी त्याने उत्कृष्टपणे पार देखील पाडली आहे. आपण या लेखात आशीष नेहराच्या प्रशिक्षणातील महत्वाच्या मुद्यांवर नजर टाकणार आहोत, ज्याच्या जोरावर गुजरात टायटन्सने हे अप्रतिम प्रदर्शन करून दाखवले आहे.

मेला लिलावात विचारपूर्व खर्च केला पैसा

आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज सारख्या संघांनी त्यांच्या जुन्या खेळाडूंना पुन्हा खरेदी करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण गुजरात टायटन्सने मात्र एखाद्या खेळाडूला संघात घ्यायचेच, असा हट्ट केल्याचे पाहायला मिळाले नाही. गुजरात आरसीबीनंतर सर्वात कमी खेळाडूंवर बोली लावणारा संघ ठरला. गुजरातने फक्त ३८ खेळाडूंना खरेदी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील २० खेळाडूंना खरेदी केले. फ्रँचायझीने लिलावात नेहराच्या मार्गदर्शनात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा संघ तयार केला, जो विजेतेपद देखील पटकावू शकतो.

संघाच्या कॅम्पमध्ये खेळाडूंवर नाहीये कसलाच दबाव

आयपीएलला जगातील सर्वोत्तम टी-२० लीग मानले जाते. अशात खेळाडूंवर या लीगमध्ये खेळताना दबाव असतो आणि संघांकडून त्यांच्यावर काटेकोर नियम लादले जातात. प्रशिक्षक नेहराने मात्र संघातील खेळाडूंवर कसल्याही प्रकारचा दबाव राहणार नाही, याची काळजी घेतली. कोरोनाच्या कारणास्तव स्पर्धा बायो बबलमध्ये खेळली जात आहेत आणि अशात खेळाडूंवर अतिरिक्त दबाव बनण्याची शक्यता असते. गुजरातच्या कॅम्पमध्ये खेळाडूंना खाण्यापिण्याचे आणि झोपण्याचे स्वातंत्र्य दिले गेले आहे. याचा चांगला परिणाम देखील खेळाडूंनी त्यांच्या प्रदर्शनातून दाखवून दिला आहे.

गोलंदाजांना शिकवले दबावाच्या स्थितीत गोलंदाजी करण्याचे धडे

आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्यांच्या १० गोलंदाजांनी आतापर्यंत ७१ विकेट्स घेतल्या आहेत. फिरकी गोलंदाज राशिद खानने १५, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने १६ विकेट्स घेतल्या आहेत. सामना हातातून निसटत चालला असताना संघाने केवळ गोलंदाजांच्या जोरावर काही सामने जिंकले आहेत. गोलंदाजांच्या या प्रदर्शनासाठी देखील प्रशिक्षक आशीष नेहराचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. नेहरा स्वतः भारताचा टी-२० स्पेशलिस्ट गोलंदाज होता. याच पार्श्वभूमीवर संघातील गोलंदाजांना नेहराच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा नेहरा कमी प्रमाणात करतो वापर

आजकाल सर्वत्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. क्रिकेटमध्ये देखील संघ विरोधी संघासाठी रणनीती बनवताना तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. गुजरात टायटन्सच्या कॅम्पमध्ये मात्र चित्र थोडे वेगळे आहे. प्रशिक्षक नेहरा आधुनिक तंत्रज्ञानापेक्षा पारंपारिक वही आणि पेन यांचा वापर करताना अनेकदा दिसला आहे. याचा अर्थ असा नक्कीच नाही, की गुजरात संघ तत्रज्ञानाचा वापर करतच नाही, पण हा वापर नक्कीच थोड्या कमी प्रमाणात केला जात आहे. आशीष नेहरा स्वतः तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून राहिल्याचे आतापर्यंत तरी पाहिले गेले नाहीये.

खेळाडूंसोबत मोठ्या भावासारखे वर्तन

आशीष नेहरा गुजरात संघाचा प्रशिक्षक जरी असला, तरी संघातील खेळाडूंसोबत त्याचे संबंध अगदी मोठ्या भावाप्रमाणे आहेत. खेळाडू त्याच्यासोबत चर्चा करताना एखाद्या मित्रप्रमाणे बोलतात. त्याचा परिणाम संघाच्या प्रदर्शनावर थेट पडल्याचे दिसत आहे. संपूर्ण हंगामातील एकही सामन्यात गुजरातच्या खेळाडूंवर कसलाही दबाव दिसला नाही.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

मेगा लिलावात बक्कळ पैसा मिळाल्याने इशानला आलं होतं टेंशन, मग विराट, रोहितने दिली ‘ही’ टिप

पुन्हा आयपीएलमध्ये दिसणार ‘मिस्टर ३६०’ची जादू, विराटने दिलेत डिविलियर्सच्या पुनरागमनाचे संकेत

‘इथे कमजोरांना जागा नाही..’, गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर लखनऊच्या खेळाडूंवर भडकला मेंटॉर गंभीर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---