दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने अजूनपर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाहीये. अशात आगामी हंगामात संघाच लक्ष ट्रॉफी जिंकण्यावर असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने पुढच्या हंगामासाठी चार खेळाडूंना संघात रिटेन केले आहे. एक मजबूत प्लेइंग इलेव्हन बनवण्यासाठी अजून सात चांगल्या खेळाडूंची गरज आहे. मेगा लिलावात संघ व्यवस्थापन ही गोष्ट लक्षात घेऊन खेळाडूंवर बोली लावेल. संघाचे मुख्य प्रशिक्षक प्रवीण आमरे (Praveen Amre) यांनी सांगितले की, संघ अशा सात खेळाडूंना लक्ष करणार आहे, जे त्यांच्या संघाला उत्तम संतुलन देऊ शकतील.
मागच्या हंगामातील चार खेळाडू दिल्ली कॅपिटल्सने संघात कायम ठेवले आहेत. यामध्ये सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ (prithvi shaw), यष्टीरक्षक फलंदाज, कर्णधाराची भूमिका पार पाडण्यासाठी रिषभ पंत (rishabh pant), डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल (axar patel) आणि वेगवान गोलंदाजच्याच रूपात दक्षिण अफ्रिकेचा एन्रिक नॉर्किए (anrich nortje) यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापनाने या चौघांवर विश्वास दाखवला, तर इतर सर्व खेळाडू मेगा लिलावात सहभागी आहेत.
आयपीएल २०२२ पूर्वी बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलावाचे आयोजन केले आहे. दिल्ली कॅपिटल्सचे ५३ वर्षीय प्रशिक्षक प्रवीण आमरेंच्या मते यावर्षी मेगा लिलावात अनेक प्रतिस्पर्धी असतील. प्रसिद्धीपत्रकात आम्रे म्हणाले की, “प्रशिक्षकाच्या भूमीकेत त्यांना एक संतुलित संघ हवा आहे. एक कोर समूह पाहिजे. आम्ही आमच्या चार खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. आमच्याकडे वरच्या फळीतील एक फलंदाज आहे. एक यष्टीरक्षक फलंदाज, एक वेगवान गोलंदाज आणि एक अष्टपैलू आहे. आम्ही आमचा बेस व्यवस्थित ठेवला आहे.”
“आता आम्हाला असे सात खेळाडू हवे आहेत, जे संघाला संतुलन देऊ शकतील. हे आमचे प्रमुख लक्ष आहे आणि हे आव्हानात्मक आहे. मेगा लिलाव नेहमीच आव्हानात्मक असतो. खासकरून जेव्हा दोन नवीन संघ देखील असतील. स्पर्धा खूप कठीण असेल. काही संघांकडे जास्त पैसा आहे. अशात लिलावाचा अनुभव कामी येतो.” असे आम्रे पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ सहभागी होणार आहेत. मागच्या हंगामात काही संघांनी खेळाडूंना रिटेन करण्यासाठी मोठी किंमत मोजली आहे. तर काही संघांनी स्वस्तात खेळाडूंना रिटेन केले आहे. दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलेले चार खेळाडू त्यांना महागात पडले आहेत. मेगा लिलावासाठी संघाकडे सर्वात कमी ४७.५ करोड रुपये शिल्लक आहेत. अशात मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्ससाठी खरोखर एक मोठे आव्हान असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या आजी-माजी कर्णधारांची घोर निराशा, संपूर्ण मालिकेत विंडीजच्या ‘या’ गोलंदाजाचे बनले गिऱ्हाईक
‘अच्छा चलता हूँ…’, म्हणत जाफरने घेतला पंजाब किंग्सचा निरोप, संघासाठी निभावत होता ‘ही’ भूमिका
‘माझं क्रेडिट दुसऱ्यांनीच घेतलं,’ असं म्हणणाऱ्या रहाणेने पाहा नक्की कुणावर साधलाय निशाणा