पहिले ४ सामने गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाने मंगळवारी (दि. १२ एप्रिल) आयपीएल २०२२च्या हंगामातील पहिला विजय मिळवला. चेन्नईने हंगामातील २२व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला २३ धावांनी नमवले आणि गुणतालिकेत दहाव्या स्थानावरून नवव्या स्थानावर उडी मारली. या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली. दरम्यान, बेंगलोर संघाच्या डावादरम्यान चेन्नईच्या ३६ वर्षीय एका क्षेत्ररक्षकाने शानदार झेल घेत सर्वांच्या भुवया उंचावल्या.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ४ विकेट्स गमावत २१६ धावा कुटल्या आणि बेंगलोरला २१७ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरची गाडी गडबडताना दिसली. बेंगलोरने फाफ डू प्लेसिस (८ धावा), विराट कोहली (१ धाव) आणि अनुज रावत (१२ धावा) या धुरंधर खेळाडूंची विकेट पावरप्लेमध्येच गमावली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलही २६ धावा करून बाद झाला. पुढे शाहबाज अहमद आणि सुयश प्रभूदेसाईने संघाचा डाव सावरला. त्यांनी ६० धावांची भागीदारी रचली आणि संघाची धावसंख्या १००च्या पार केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
अंबाती रायुडूचा शानदार झेल
यावेळी बेंगलोर संघाला शेवटच्या ५ षटकात ७७ धावांची आवश्यकता होती. दरम्यान, चेन्नईकडून १६वे षटक कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) टाकत होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर जडेजाने गुड लेंथवर फेकला आणि यावेळी फलंदाजी करणाऱ्या आकाश दीपने घाईत फटका मारला. हा चेंडू शॉट कव्हरवर उभा असलेल्या अंबाती रायुडूपासून (Ambati Rayudu) थोड्या अंतरावर होता. मात्र, त्याने चित्त्याच्या चपळाईने झेप घेत एकहाती अविश्वसनीय झेल घेतला. ३६ वर्षांच्या वयातही रायुडूची ही स्फूर्ती पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या.
https://twitter.com/Shaun81172592/status/1513945950141632512
रायुडूने केली नाही फलंदाजी
प्रथम फलंदाजी चेन्नई संघाकडून करताना रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबेच्या धमाकेदार भागीदारीच्या जोरावर २० षटकात ४ विकेट्स गमावत २१६ धावा केल्या होत्या. सामन्यात रायुडूच्या आधी फलंदाजीसाठी दुबेला पाठवण्यात आले होते आणि हा निर्णय योग्य ठरला.
https://twitter.com/ADNANKH85410496/status/1513953673231036416
A one-handed stunner from @RayuduAmbati as Akash Deep departs for a duck.
Live – https://t.co/KYzdkMrSTA #CSKvRCB #TATAIPL pic.twitter.com/i9W8kBo5nf
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022
शिवम दुबेने या सामन्यात ४६ चेंडूत ९५ धावा ठोकल्या. त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार निघाले. दुबेने २०६.५२च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. दुसरीकडे, सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पाने ५० चेंडूत ८८ धावांची आतिषी खेळी केली. त्यात उथप्पानेही ४ चौकार आणि ९ षटकारांचा पाऊस पाडला होता.
६ कोटी २५ लाखांत चेन्नईचा भाग बनला होता रायुडू
आयपीएल २०२२मधील चेन्नईचा हा पहिला विजय असून यापूर्वीच्या ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. रायुडूला या हंगामात खास कामगिरी करता आली नाहीये. त्याने या हंगामात खेळलेल्या ५ सामन्यात फक्त ८५ धावा केल्या आहेत. चेन्नईने रायुडूला ६ कोटी २५ लाख रुपयात आपल्या संघात सामील केले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: टी२०मध्ये आपला ‘बनी’ बनलेल्या मॅक्सवेलला बाद करताच जडेजाचे ‘गन सेलिब्रेशन’ व्हायरल
IPL2022| मुंबई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
Video: ‘कॅप्टनकूल’च्या रणनीतीमध्ये फसला विराट; पुल शॉट मारायच्या नादात ‘अशी’ दिली विकेट