इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघांमध्ये गणना होणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स होय. चेन्नईने आतापर्यंत ४ वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. मात्र, आयपीएल २०२२ चेन्नईसाठी खूपच निराशाजनक राहिला आहे. आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये फक्त ४ सामने जिंकत चेन्नई गुणतालिकेत नवव्या स्थानावर विराजमान आहे. खराब कामगिरी केल्यानंतरही चेन्नईसाठी काही प्रमाणात चांगल्या गोष्टीही झाल्या आहेत. संघाला २-३ खेळाडू असे मिळाले आहेत, जे दीर्घ काळासाठी फ्रँचायझीकडून खेळू शकतात. यामध्ये न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे, महाराष्ट्राचा मुकेश चौधरी आणि श्रीलंकेचा महीश तीक्षणा यांचा समावेश आहे. तीक्षणाने तर फक्त एमएस धोनीसोबत खेळण्यासाठी खास कारनामा केला आहे.
श्रीलंकेचा धाकड गोलंदाज महीश तीक्षणा (Maheesh Theekshana) याने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाविरुद्ध ३३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आणि हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली. चेन्नईने तीक्षणाला आयपीएल (IPL) लिलावात ७० लाख रुपयांमध्ये विकत घेतले होते. त्याला चेन्नईकडून खेळणे सोपे नव्हते. त्याने चेन्नईने शेअर केलेल्या व्हिडिओत सांगितले आहे की, कशाप्रकारे आयपीएलमध्ये खेळण्यासाठी त्याने आपल्या फिटनेसवर काम केले.
तीक्षणा म्हणाला की, “१९ वर्षांखालील क्रिकेटच्या दिवसांमध्ये माझे वजन ११७ किलो होते. यो-यो टेस्ट पास होण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली. २०२०मध्ये मी सर्व काही सोडून दिले होते. शरीराला सावरण्यासाठी सतत प्रयत्न केले. मी त्याच वर्षी अजंता मेंडिस आणि २०२२मध्ये एमएस धोनीशी बोललो. २०२१मध्ये मी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा नेट बॉलर होतो. चेन्नईच्या संघात मी खरेदी केला जाईल यावर विश्वास बसत नव्हता.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे बोलताना तो म्हणाला की, “२०१७-१८मध्ये मी १९ वर्षांखालील संघात होतो. मात्र, मला खेळण्याची संधीच मिळाली नाही. मी अनेकदा फिटनेस टेस्टमध्ये नापास झालो होतो. २०१९मध्ये १० तीनदिवसीय सामन्यांत मी वॉटर बॉय होतो.” तीक्षणाने हेही सांगितले की, १९ वर्षांखालील दिवसादरम्यान त्याला आपल्या वजनामुळे नेहमीच संघातून बाहेर पडावे लागायचे. तो म्हणाला, “यामुळे मी माझा आत्मविश्वास अजिबात खचू दिला नाही. मला माहिती होतं की, जर मी फिटनेस टेस्टमध्ये नापास झालो, तर पुन्हा एकदा वॉटर बॉय बनावे लागेल. त्यामुळे मी आणखी मेहनत घेतली आणि २०२२मध्ये इथे आहे.”
तीक्षणाने त्याचे आयपीएल पदार्पण हे रवींद्र जडेजाच्या नेतृत्वात केले होते. मात्र, लवकरच त्याला एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळाली. भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीबद्दल बोलताना तीक्षणाने सांगितले की, “धोनी काहीही करू शकतो. मी नेहमीच त्याच्याकडून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतो. खरं तर, मला चेन्नई सुपर किंग्स संघ खूप आवडते. कारण, धोनी माझा आवडता खेळाडू आहे. मला त्याच्यासोबत टेबल टेनिस खेळण्याची संधी मिळाली, माझे लक्ष्य त्याच्यासोबत खेळण्याचे होते.”
चेन्नई सुपर किंग्स संघाचा पुढील सामना मुंबई इंडियन्स संघाशी गुरुवारी (दि. १२ मे) सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वॉर्नरची आयपीएलमधील ‘या’ विक्रमात विराट, शिखरशी बरोबरी, आता केवळ रैना आहे पुढे
आयपीएल २०२२ मध्ये ५८ सामन्यांत झालीये ८०० पेक्षाही जास्त षटकारांची बरसात, ‘हा’ संघ अव्वलस्थानी
आयपीएल २०२२ संपताच ‘हा’ दिग्गज सोडणार केकेआरची साथ, ज्याने पहिल्याच सामन्याला बनवलेले अविस्मरणीय