चार वेळचा आयपीएल चॅम्पियन ठरलेला संघ चेन्नई सुपर किंग्ज संघ त्यांच्या शांत आणि संयमी खेळीसाठी ओळखला जातो. अडचणीच्या काळात संघाने अनेकदा हीच भूमिका घेऊन विजय मिळवला आहे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आयपीएल २०२२मध्ये सीएसकेसाठी शांत खेळ करण्यासारखी स्थिती आता उरलेली नाही. संघाला जर प्लेऑफमध्ये पोहचायचे असेल, तर आक्रमक खेळ दाखवावा लागणार आहे. सोमवारी (२५ एप्रिल) अंबाती रायुडूने असाच खेळ दाखवला.
चालू हंगामात सीएसकेने खेळलेल्या पहिल्या आठ सामन्यांपैकी फक्त दोन सामने त्यांना जिंकता आले आहेत. इतर ६ सामन्यांमध्ये संघाला पराभव मिळाला आहे. अशात आता संघाला आक्रमक खेळ करून पुढच्या प्रत्येक सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. याच कारणास्तव सोमवारी पंजाब किंग्जविरुद्ध अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने ज्या पद्धतीचे प्रदर्शन केले, त्याचे कौतुक करणे गरजेचे आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाब किंग्जविरुद्धच्या या सामन्यात सीएसकेच्या बाजूने अंबाती रायुडूने एकाकी झुंज दिली. परंतु त्याला संघातील इतर एकही फलंदाज अपेक्षित साथ देऊ शकला नाही. सीएसकेचा अजून एखादा फलंदाज रायुडूप्रमाणे खेळला असता, तर संघाला विजय मिळू शकत होता. परंतु तसे झाले नाही आणि पंजाबने ११ धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर सीएसके आगामी सामन्यांमध्ये त्यांच्या फलंदाजीत थोडी आक्रमकता आणेल, अशी अपेक्षा चाहत्यांना असेल.
रायुडूने पंजाबविरुद्धच्या या सामन्यात ३९ चेंडूंमध्ये ७८ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ७ चौकार आणि ६ षटकार निघाले. जोपर्यंत खेळपट्टीवर होता, तोपर्यंत पंजाब किंग्जची चांगलीच दाणादाण उडाली होती. त्याच्या या प्रदर्शनानंतर सीएसकेला मिळालेल्या पराभवासाठी कोणीही रायुडूवर बोट दाखवू शकणार नाही.
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्सच्या नुकसानावर १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबकडून मिळालेले १८८ धावांचे लक्ष्य सीएसकेला गाठता आले नाही. सीएसकेने मर्यादित २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १७६ धावा केल्या आणि ११ धावांनी पराभव स्वीकारला. गुणतालिकेत सीएसके सध्या ४ गुणांसह ९व्या क्रमांकावर आहे, पण अजूनही त्यांच्याकडे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फॅमिली मॅटर झालं नाहीतर गोनी टीम इंडियाचा खरंच लिजंड झाला असता
रवी शास्त्रींचा धक्कादायक खुलासा! म्हणाले, ‘भारतातील जळणाऱ्या लोकांना वाटायचं की, मी…