चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएलमधील एक यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. सीएसके फ्रँचायझी वर्षभर काही ना काही उपक्रमही राबवत असतात. फ्रँचायझी युवा खेळाडूंसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. याबद्दलची माहिती चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) फलंदाजी प्रशिक्षक माइक हसी (Michael Hussey) यांनी दिली.
माइक हसी रविवारी (२७ फेब्रुवारी) म्हणाले की, सुपर किंग्स युवा खेळाडूंसाठी क्रिकेट प्रशिक्षण केंद्र स्थापन करेल आणि एक दिवस त्यांना आयपीएलमध्ये सीएसकेसाठी क्रिकेट खेळण्यात मदत करेल. अकादमीचे संचालन एप्रिल २०२२ मध्ये सुरु होईल. तसेच केएस विश्वनाथन यांनी सांगितले की, अकादमी वर्षभर प्रशिक्षण देईल.
सीएसकेचे गोलंदाजीचे प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी म्हणाले की, “देशातील विविध भागांतून तयार होत असलेल्या खेळाडूंना फायदा होईल. सीएसके सुरुवातीला चेन्नई आणि सलेममध्ये सुपर किंग्स अकादमीची स्थापना करेल, तसेच येणाऱ्या काळात तमिळनाडू, भारत आणि बाकी जगात याचा विस्तार करेल. चेन्नईमध्ये पहिल्या अकादमीची थोरईपक्कममध्ये स्थापन होईल. तसेच सलेममध्ये एक क्रिकेट फाऊंडेशनमध्ये होईल.”
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर हसी म्हणाला की, “मला वाटते की ही एक शानदार उपक्रम आहे, मी यासाठी खुप उत्साही आहे. मला वाटते की हे अनेक युवा खेळाडूंना काही उत्कृष्ट सुविधा, काही कौशल्यांपर्यंत पोहचण्याची संधी देईल आणि आशा आहे की ते त्यांच्या खेळात सुधारणा करतील. नंतर एकदिवस या अकादमीतून आयपीएलमध्ये सीएसकेसाठी खेळणारे अनेक खेळाडू पाहणे शानदार असेल.”
सीएसकेने म्हटले आहे की, “अकादमीमध्ये अनुभवी, बीसीसीआय प्रमाणित प्रशिक्षक असतील. जे प्रशिक्षक खेळाडूंना शिकण्याची प्रणाली प्रदान करतील. अकादमीकडे सीएसकेकडून शिकणे आणि प्रशिक्षण पद्धती, सीएसकेचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या अतिथी व्याख्यानांचा समावेश असेल.”
सीएसके फ्रँचायझीचे सीईओ केएस विश्वनाथन म्हणाले की, “आम्ही ५ दशकांहून अधिक काळ क्रिकेट जगाशी निगडित आहोत, आम्हाला विश्वास आहे की आमच्यासाठी क्रिकेटमध्ये योगदान देण्याचा हा योग्य मार्ग आहे. याद्वारे आम्ही आमचा अनुभव येणाऱ्या तरुण पिढीला सांगू शकू. सुपर किंग्ज अकादमीमधून युवा खेळाडूंना क्रिकेट शिकण्याची नवी दारे खुली होतील. अनुभवी कोचिंग स्टाफसह, आम्ही मुला-मुलींना भविष्यासाठी तयार करू.” ही अकादमी लवकरच सुरु होईल आणि त्याचा युवा खेळाडूंना देखील फायदा होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
चार टी२० सामने, जेव्हा भारतीय यष्टीरक्षक बनले ‘सामनावीर’; पण धोनीचे मात्र नाव नाही
वाढदिवस विशेष : कर्णधारपद नाकारतच बोर्डाची झाली खप्पामर्जी अन् अकाली संपली अझर मेहमूदची कारकीर्द