---Advertisement---

धमाकेदार खेळीनंतर सोशल मीडियावर धोनी भाऊचीच चर्चा! चाहते आनंदात

On: रविवार, मार्च 27, 2022 12:17 AM
dhoni 50 kkr
---Advertisement---

शनिवारी (२६ मार्च) आयपीएल २०२२ चा पहिला सामना खेळला गेला. हा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे अपेक्षित प्रदर्शन केले नाही. पण त्यांचा माजी कर्णधार एमएस धोनीने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. धोनीच्या प्रदर्शनामुळे चाहत्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी एमएस धोनीने त्याची आयपीएल फ्रेंचायझी सीएसकेचे कर्णधारपद सोडले. रवींद्र जडेजाच्या रूपात सीएसकेला नवीन कर्णधार मिळाला. परंतु जडेजा कर्णधाराच्या रूपातील पहिल्या सामन्यात संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

एमएस धोनी एकमेव खेळाडू ठरला, ज्याने सीएसकेसाठी या सामन्यात अर्धशतक केले. धोनीने ३८ चेंडूंचा सामना केला आणि यामध्ये सर्वाधिक ५० धावा केल्या. यादरम्यान धोनीने ७ चौकार आणि १ षटकारही मारला. ४० वर्षीय धोनीने केलेली ही खेळी पाहून अनेकांना आश्चर्य झाले. चाहते त्याचे प्रदर्शन पाहून सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. धोनीच्या प्रदर्शनावर आधारीत अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दिग्गज सचिन तेंडुलकरनेही ट्वीट करून धोनीचे कौतुक केले आहे.

https://twitter.com/TVF__Official/status/1507773872573071361?s=20&t=xY494SPEAZyX9DHKoydZ1Q

https://twitter.com/Saro_bala_/status/1507746831228280835?s=20&t=xY494SPEAZyX9DHKoydZ1Q

सामन्याचा विचार केला, तर कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वप्रथम केकेआरसाठी नाणेफेक जिंकली आणि सीएसकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे पूर्णपणे अपयशी ठरले. ऋतुराजने एकही धाव केली नाही, तर कॉनवे अवघ्या ३ धावा करून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला अनुभवी रॉबिन उथप्पा २८ धावा करून बाद झाला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरील अंबाती रायुडूने १५ धावांचे योगादन दिले. धोनी ५० आणि जडेजा २६ धावांसह नाबाद राहिले. सीएसकेने ५ विकेट्सच्या नुकसानावार १३१ धावा केल्या.

प्रत्युत्तरात, केकेआरसाठी अनुभवी सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणेने चांगली सुरुवात दिली. पण वेंकटेश अय्यर त्याची साथ देऊ शकला नाही. रहाणेने ४४ तर वेंकटेशने १६ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावरील नितीश राणाने २१, तर सॅम बिलिंग्सने २५ धावांचे योगदान दिले. कर्णधार श्रेयस अय्यर २० आणि यष्टीरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सन ३ धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिले.  सीएसकेने दिलेले लक्ष्य केकेआरने १८.३ षटकांमध्ये आणि ४ विकेट्सच्या नुकसानावर गाठले.

महत्वाच्या बातम्या –

पहिल्याच सामन्यात माहीचा जलवा.! IPL इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा ‘क्रमांक एकचा’ ठरला भारतीय

केकेआरच्या युवा किपरची कला पाहून मास्टर-ब्लास्टरला आठवला धोनी; क्षणार्धात केले ट्विट

आया है राजा..! ‘थाला’च्या एन्ट्रीवेळी चाहत्यांनी मैदान अक्षरशः डोक्यावर घेतले, Video तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---