इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाची सुरुवात शनिवारी (२६ मार्च) झाली. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्ड हे दोन संघ आमने सामने होते. हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला असून चेन्नई सुपर किंग्जसाठी सामन्याची सुरुवात अपेक्षित झाली नाही. सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड स्वस्तात तंबूत परतला.
केकेआरने सीएसकेला (चेन्नई सुपर किंग्ज) सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. डावाची सुरुवात करण्यासाठी युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे (Devon Conway) आले. केकेआरसाठी पहिल्या षटकात अनुभवी उमेश यादव (Umesh Yadav ) गोलंदाजीसाठी आला. उमेशने टाकलेल्या पहिल्याच षटकात त्याला यश मिळाले. ऋतुराजच्या रूपात त्याने मोठी शिकार केली. षटकाच्या सुरुवातील त्याने नो बॉल टाकला. पहिला चेंडू डॉट गेला. त्याने त्याने पुन्हा एक वाईड चेंडू टाकला. पुढे उमेशने टाकलेला दुसरा चेंडूही डॉट गेला.
यादवच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मात्र स्ट्राइवर असलेल्या ऋतुराजने चकमा खालला. हा चेंडू ऋतुराजच्या बॅटचा किनारा घेऊन स्लीप्समध्ये उभा असलेल्या नितीश राणाच्या हातात गेला. राणाने कसलीही चूक न करता झेल घेतला. ऋतुराजने एकही धाव न करता विकेट गमावली आणि संघाच्या अडचणी वाढवल्या.
एकंदरीत पाहता उमेश यादवने केकेआरला एक चांगली सुरुवात करून दिली. त्याने स्वतःच्या पहिल्या तीन षटकांमध्ये दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. पहिल्या षटकात ऋतुराज आणि डावाच्या पाचव्या षटकात त्याने कॉनवेला तंबूचा रस्ता दाखवला. पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवर सलामीवीर कॉनवेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण श्रेयस अय्यरच्या हातात झेलबाद झाला. संघाची धावसंख्या अवघी २९ असताना सीएसकेच्या दोन्ही सलामीवीरांनी विकेट्स गमावल्या.
चेन्नई सुपर किंग्ज (KKR) आणि कोलकाता नाइट रायडर्स (CSK) हे दोन संघ आयपीएलच्या मागच्या हंगामात अंतिम सामन्यामध्ये आमने सामने होते. याच कारणास्तव आयपीएल २०२२ चा पहिला सामना याच दोन संघात खेळला गेला. गुरुवारी (२४ मार्च) एमएस धोनी (MS Dhoni) याने सीएसकेचे कर्णधारपद सोडले असून, रवींद्र जडेजाला पहिल्यांदाच आयपीएल फ्रेंचायझीसाठी कर्णधारपदाची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
अखेर मेहनत फळाला आली! तब्बल इतक्या सामन्यांच्या प्रतीक्षेनंतर जड्डू बनला कॅप्टन
CSK Anthem Song | सीएसकेचे नवे अँथम सॉन्ग रिलीज, धांसू अंदाजात दिसतोय ‘थाला’; Video पाहिलाय का?
रिकी पाँटिंगला ‘या’ खेळाडूमध्ये दिसतोय भारताचा भावी कर्णधार, रोहितशी तुलना करत सांगितले साम्य