आयपीएलच्या मैदानात सोमवारी (२५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज अशी लढत पाहायला मिळाली. या सामन्यात सीएसकेला पंजाबने ११ धावांनी मात दिली. सीएसकेचा हंगामातील हा सहावा पराभव ठरला, तर पंजाब किंग्जचा चौथा विजय ठरला. पंजाब किंग्जला मिळालेल्या विजयात श्रीलंकन फलंदाज भानुका राजपक्षाची भूमिका महत्वाची ठरली. सीएसकेच्या खेळाडूंनी जर त्याला दोन वेळा जीवनदान दिले नसते, तर सामन्याचा निकाल देखील वेगळा लागला असता.
सीएसकेसारख्या बलाढ्य संघाकडून भानुका राजपक्षासारख्या खेळाडूला या सामन्यात दोन वेळा जीवनदान मिळाले. परिणामी भानुका राजपक्षा (Bhanuka Rajapaksa) आणि शिखर धवन यांनी ११० धावांची भागीदारी पार पाडली. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने ४ विकेट्सच्या नुकसानावर १८७ धावा केल्या. सीएसकेचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि मिचेल सॅटनर यांनी दोन महत्वाचे झेल सोडल्यामुळे पंजाबला ही सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबच्या डावातील ७ व्या षटकात सीएसकेचा कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) त्याच्या स्पेलमधील पहिले षटक टाकण्यासाठी आला. जडेजाने राजपक्षाला बाद करण्यासाठी पहिली संंधी बनवली होती. परंतु डीप स्क्वेअर लेगवर ऋतुराज गायकवाडने त्याचा झेल सोडला. त्यानंतर जडेजा डावाच्या ९ व्या षटकात त्याच्या स्पेलचे दुसरे षटक टाकण्यासाठी आला. जडेजाने राजपक्षाला पुन्हा एकदा त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले, पण यावेळी सीमारेषेजवळ उभा असलेल्या मिचेल सॅटनर हातात आलेला झेल सोडला.
यादरम्यान, श्रीलंकन फलंदाजाला जीवनदान तर मिळालेतच, पण सीएसकेला ६ धावांचे नुकसान देखील झाले. सॅटनरने केवळ राजपक्षाचा झेलच सोडला नाही, तर तो चेंडू त्याच्या हातातून उडून थेट सीमारेषेबाहेर पडला होता. परिणामी पंजाबला या चेंडूवर सहा धावा मिळाल्या. राजपक्षाचा पहिला झेल ज्यावेळी सुटला, तेव्हा त्याने अवघी एक धाव केली होती.
https://twitter.com/rishobpuant/status/1518602085352189952?s=20&t=iaPG9RezEHuCI__LShr1Tg
पुढे खेळताना त्याने ३२ चेंडूत वैयक्तिक ४२ धावा केल्या आणि सलामीवीर धवनला चांगली साथ दिली. धवनने ५९ चेंडूत नाबाद ८८ धावा ठोकल्या. दरम्यान, पंजाबकडू मिळालेल्या १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेला विजय मिळाला नाही. सीएसकेने मर्यादित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १७६ धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वयाच्या ६६व्या वर्षी भारताचा माजी क्रिकेटपटू करणार दुसरे लग्न, नवरीचे वय ऐकून बसेल धक्का
CSKvsPBKS | अंबाती रायुडूची एकाकी झुंज व्यर्थ, पंजाबकडून चेन्नईचा ११ धावांनी पराभव
अनुभवी असूनही ब्रावोने २ वेळा क्रिज बाहेर फेकला चेंडू, मग अंपायरनेही दिला जशास तसा निर्णय