मंगळवारी (दि. १२ एप्रिल) आयपीएल २०२२च्या २२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने जबरदस्त फलंदाजी प्रदर्शन केले. सीएसकेसाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता, कारण त्यांची चालू आयपीएल हंगामात अद्याप एकही सामना जिकंलेला नव्हता. याच पार्श्वभूमीवर सीएसकेचा सलामीवीर रॉबिन उथप्पाने मोठी खेळी केली आणि स्वतःच्या नावार महत्वाच्या विक्रमांची नोंद देखील केली.
प्रथम फलंदाजी करताना सीएसकेसाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) मोठी खेळी खेळण्याच्या उद्देशासह मैदानात आले. उथप्पाने त्याची रनणीती प्रत्यक्षात उतरवली, पण ऋतुराज मात्र पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. ऋतुराजने १६ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्या आणि जोश हेजलवुडच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला. उथप्पाने मात्र या सामन्यात स्वतःच्या नावापुढे ८८ धावा जोडल्या. यासाठी त्याने ५० चेंडू खेळले आणि यामध्ये ५ चौकार, तर तब्बल ९ षटकार ठोकले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
या अप्रतिम प्रदर्शनादरम्यान उथप्पा सीएसकेसाठी एखाद्या आयपीएल सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये ब्रेंडन मॅक्युलम, मायकल हसी यांच्यासह दुसरा क्रमांक पटकावला आहे. एका आयपीएल सामन्यात सीएसकेसाठी सर्वात जास्त षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर मुरली विजय (Murali Vijay) आहे, ज्याने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एका सामन्यात तब्बल ११ षटकार ठोकले होते. यादीत दुसऱ्या क्रमांकावर आता उथप्पा आला आहे, ज्याने आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात ९ षटकार मारले. तिसऱ्या क्रमांकावर ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) आहे, ज्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एका सामन्यात ९ षटकार मारले होते. चौथ्या क्रमांकावर मायकल हसी आहे, ज्याने पंजाब किंग्जविरुद्धच्या एका सामन्यात ९ षटकार मारले होते.
उथप्पाव्यतिरिक्त चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शिवम दुबेनेही आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात मोठी खेळी केली. दुबेने अवघ्या ४६ चेंडूत नाबाद ९५ धावा ठोकल्या. यादरम्यान दुबेने ५ चौकार आणि ८ षटकार ठोकले. दुबे आणि उथप्पाने केलेल्या महत्वाच्या धावांमुळे सीएसकेने मर्यादित २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर २१६ धावा केल्या आणि आरसीबीला विजयासाठी २१७ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, बेंगलोर संघाला ९ विकेट्स गमावत १९३ धावाच करता आल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आरसीबी जिंकत नाही, तोपर्यंत लग्नच करणार नाही’, पाहा कोण आहे ‘ती’ तरुणी
मुंबईच्या ताफ्यातील युवा खेळाडूंना बूम बूम बुमराहचा मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘आता इतिहास विसरा…’
हरभजनचा ‘माही’वर घणाघात; “एकट्या धोनीने वर्ल्डकप जिंकवला, मग बाकीचे काय …. प्यायला गेले होते का”