चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने रविवारी (१ मे) रात्री सनरायझर्स हैदराबादविरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केले. परंतु अवघी एक धाव कमी पडल्यामुळे त्याचे शतक हुकले. चालू हंगामातील त्याला आतापर्यंत अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते, पण या सामन्यानंतर त्याने एका खास विक्रमात थेट दिग्गज सचिन तेंडुलकरची बरोबरी केली.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs SRH) या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या सीएसकेला सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवॉन कॉनवे यांनी अप्रतिम सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी १०७ चेंडूत १८२ केल्या. चालू हंगामातील ही १५० धावांपेक्षा मोठी तिसरा भागीदारी देखील ठरली. ऋतुराजचने ५७ चेंडू खेळले, ज्यामध्ये ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९९ धावा ठोकल्या, तर कॉनवेने ५५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८५ धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणेकर असलेल्या ऋतुराजचने हैदराबादविरुद्ध केलेल्या या ९९ धावांच्या खेळीदरम्यान वैयक्तिक १००० आयपीएल धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी डावांमध्ये स्वतःच्या १००० आयपीएल धावा करणाऱ्यांमध्ये ऋतुराजने महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची बरोबरी केली आहे. या दोघांनी पहिल्या ३१ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शॉन मार्शने अवघ्या २१ डावांमध्ये स्वतःच्या १००० आयपीएल धावा साकार केल्या होत्या. मार्श या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचा लेंडल सिमन्स या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने २३ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मॅथ्यू हेंडन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने १००० आयपीएल धावा करण्यासाठी २५ डाव खेळले. सचिन आणि ऋतुराज या यादीत संयुक्तरीत्या आठव्या क्रमांकावर आहेत.
सर्वात कमी डावांमध्ये १००० आयपीएल धावा करणारे खेळाडू
२१ – शॉन मार्श
२३ – लेंडल सिमन्स
२५ – मॅथ्यू हेडन
२६ – जॉनी बेयरस्टो
२७ – ख्रिस गेल
२८ – केन विलियम्सन
३० – मायकल हसी
३१ – ऋतुराज गायकवाड*
३१ – सचिन तेंडुलकर
३२ – ऍडम गिलख्रिस्ट
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शंभराहून मोलाचे नव्व्याण्णव! ऋतुराजचे आयपीएलमधील दुसऱ्या शतकाचे स्वप्न भंगले
याला म्हणतात सातत्य! एक, दोन नव्हे सलग ५ हंगामात केएल राहुलने खोऱ्याने काढल्यात धावा