सनरायझर्स हैदराबादचा उमरान मलिकने वेगवान गोलंदाजी करून आयपीएल २०२२ मध्ये फलंदाजांच्या अडचणी वाढवल्या आहेत. परंतु रविवारी (१ मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात उमरान मलिक त्याची जादू दाखवू शकला नाही. उमरानला या सामन्यात विकेट्स तर घेता आल्या नाहीतच, पण तो धावांवर देखील लगाम लावू शकला नाही. सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने त्याची चांगलीच धुलाई केली. ऋतुराजने उमरानला एक असा षटकार मारला, जो पाहून प्रत्येकजण हैराण झाला.
सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २ विकेट्सच्या नुकसानावर २०२ धावा उभ्या केल्या. ही मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी त्यांचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवॉन कॉनवेचे योगदान सर्वात महत्वाचे ठरले. ऋतुराज शतक करणारच होता, पण तितक्यात वेगवान गोलंदाज टी नटराजनच्या चेंडूवर झेलबाद झाला. फक्त एक धाव कमी पडल्यामुळे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झाले नाही. त्याने ५७ चेंडूत ९९ धावा केल्या. यामध्ये ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सीएसकेच्या डावातील आठवे षटक उमरान मलिक (Umran Malik) घेऊन आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर ऋतुराजने एक जबरदस्त षटकार मारला. त्याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार पाहून अनेकांना विश्वास बसत नव्हता की, ऋतुराज उमरान मलिकसारख्या वेगवान गोलंदाजाला असे मोठे शॉट्स मारू शकतो. त्याआधी या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने चौकार देखील मारला होता. यावेळी मलिकची रिऍक्शन पाहण्यासारखी होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
WATCH – Up and over: Ruturaj's delectable six off Umran Malik!
📽️📽️https://t.co/EB1uxrXUj2 #TATAIPL #SRHvCSK
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सनराझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सीएसकेने प्रथम फलंदाजी केली आणि २०३ धावांचे लक्ष्य हैदराबादसमोर ठेवले. प्रत्युत्तरात हैदराबादचे फलंदाज हे लक्ष्य गाठू शकले नाहीत. मर्यादित २० षटकात हैदराबादने ६ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या आणि सीएसकेने १३ धावांनी सामना जिंकला.
सीएसकेसाठी ऋतुराजची उत्तम साथ देत डेवॉन कॉनवेने देखील ५५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८५ धावा ठोकल्या, तर दुसरीकडे हैदराबादसाठी निकोलस पूरनची एकाकी झुंज संघाच्या कामी येऊ शकली नाही. पूरनने अवघ्या ३३ चेंडूत ६४ धावा ठोकल्या. यामध्ये ३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. उमरान मलिक (४ षटकात ४८ धावा) हैदराबादसाठी महागात पडला आणि विकेट देखील घेऊ शकला नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीला पुन्हा कर्णधाराच्या रुपात पाहताच चाहत्यांचा उत्साह शिगेला; भविष्याबद्दल ‘कॅप्टनकूल’ म्हणतोय…
गौतम गंभीरने जेंटलमन क्रिकेटच्या प्रतिमेला केले मलिन! विजयानंतर दिसला शिवीगाळ करताना