पुण्याच्या एमसीएस स्टेडियमवर रविवारी (१ मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबात या दोन संघात आमना- सामना झाला. या सामन्यात सीएसकेच्या सलामीवीरांनी जबरदस्त प्रदर्शन केले आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने चालू हंगामात अनेक वेगवान चेंडू टाकून प्रभाव पाडला आहे. सीएसकेविरुद्ध त्याने हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला.
तसे पाहिले, तर सीएसके आणि हैदराबाद यांच्यातील रविवारी खेळेल्या गेलेल्या सामन्यात खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल होती. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने २ विकेट्सच्या नुकसानावर २०२ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर ऋतुराज गायकवाडचे सर्वात योगदान सर्वात मोठे होते. ऋतुराजने ५७ चेंडूत ९९ धावा केल्या आणि शतकासाठी अवघी एक धाव कमी असताना झेलबाद झाला, तर दुसरीकडे वेगवान गोलंदाज टी नटराजन हैदराबादसाठी सर्वोत्तम प्रदर्शन करणारा ठरला. सीएसकेने गमावेल्या दोन्ही विकेट्स नटराजनच्या खात्यात गेल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जम्मू काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) भारतीय संघाचा भविष्यातील महत्वाचा खेळाडू असेल, असे अनेकदा सांगितले जाते. यामागचे कारण आहे, त्यांच्याकडे असलेली गती. उमरान ताशी १४५-१५० किमीच्या वेगाने निरंतर गोलंदाजी करू शकतो. या सामन्यात त्याने एक पाऊल पुढे टाकत ताशी १५४ किमी वेगाने एक चेंडू टाकला. आयपीएल २०२२मध्ये टाकला गेलेला हा सर्वात वेगवान चेंडू देखील ठरला.
उमरानने या सामन्यात हंगामातील सर्वात वेगवान चेंडू जरी टाकला असला, तरी त्याचे प्रदर्शन मात्र अपेक्षित राहिले नाही. गुजरात टायटन्सविरुद्ध मागच्या सामन्यात ५ विकेट्स घेणारा उमरान या सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नाही. उमरान धावादेखील रोखू शकला नाही. त्याने टाकलेल्या ४ षटकात तब्बल ४८ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट न घेतल्यामुळे संघाला चांगलाच महागात पडला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिलदार विलियम्सन! ९९वर बाद झालेल्या ऋतूराजचं पहिलं सांत्वन केलं विलियम्सनने
शंभराहून मोलाचे नव्व्याण्णव! ऋतुराजचे आयपीएलमधील दुसऱ्या शतकाचे स्वप्न भंगले
याला म्हणतात सातत्य! एक, दोन नव्हे सलग ५ हंगामात केएल राहुलने खोऱ्याने काढल्यात धावा