---Advertisement---

सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात धडाडणार ‘स्टेनगन’, सांभाळणार मोठी जबाबदारी! पाहा संपूर्ण स्टाफ

On: गुरूवार, डिसेंबर 16, 2021 11:16 PM
Dale-Steyn
---Advertisement---

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सर्व संघांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळतील. पुढच्या वर्षीच्या आयपीएलपूर्वी मेगा लिलाव आयोजित  केला जाणार आहे, तसेच दोन नवीन संघ देखील स्पर्धेत सामील होणार आहेत. आता अशी माहिती समोर येत आहे की, दक्षिण अफ्रिका संघाचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन (dale steyn) आयपीएल फ्रेचायझी सनरायझर्स हैदराबाद (sunrisers hydarabad) साठी गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारू शकतो.

स्टेनने आयपीएलच्या इतिहासात एकूण ९५ सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच यावर्षी ऑगस्ट महिन्यात सर्व प्रकारच्या लीग स्पर्धांमधून देखील निवृत्ती घेतली. आता तो गोलंदाजी प्रशिक्षकाच्या रूपात एक नवीन जबाबदारी स्वीकारण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्टेन आणि सनरायझर्स हैदराबादच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि पुढच्या आठवड्यात फ्रेंचायझी याबाबतीत आधिकृत घोषणा करू शकते.

हैदराबाद संघात स्टेन आता टॉम मूडींसोबत काम करेल. मूडी आगामी हंगामापासून हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. ट्रेवर बेलिस यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी हैदराबाद संघासोबतचा करार संपला आहे, आता मूडी त्यांची जागा घेतील. स्टेन व्यतिरिक्त भारताचे माजी अष्टपैलू हेमंग बधानीदेखील हैदराबाद संघसोबत जोडले जाण्याची माहिती मिळाली आहे. बधानी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडू संघासाठी खूप सामने खेळले आहेत.

सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक ट्रेवर बेलिस, फलंदाजी प्रशिक्षक ब्रेड हॅडिन आणि मेंटॉर वीवीएस लक्ष्मण यांनी संघाची साध सोडली आहे. अशात पुढच्या हंगामासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाला नवीन सपोर्ट स्टाफची आवश्यकता असणार आहे. आता टॉम मूडी, डेल स्टेन आणि हेमंग बधानी हे हैदराबादच्या सपोर्ट स्टाफमध्ये एकत्र काम करताना दिसतील, असा अंदाज आहे.

स्टेनच्या कारकिर्दीचा विचार केला, तर तो क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने खेळलेल्या ९३ कसोटी  सामन्यांमध्ये ४३९ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने हे प्रदर्शन २२.९५ च्या सरासरीने केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १२५ सामने खेळले आहेत आणि १९६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी-२० मध्ये खेललेल्या ४७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६४ विकेट्स स्वतःच्या नावावर केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने डेक्कन चार्जर्स, गुजरात लायंस आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांचे प्रतिनिधित्व केले आहे आणि ९७ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

धक्कादायक! राष्ट्रीय नेमबाज कोनिका लायकची आत्महत्या, गेल्या ४ महिन्यांतील चक्क चौथी घटना

मुंबई सिटी एफसीला विजयासाठी चेन्नईयन एफसीनं झुंजवले, अखेरच्या क्षणाला राहुल भेकेचा विजयी गोल

‘विनलेस’ ईस्ट बंगालविरुद्ध खेळ उंचावण्यास नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी उत्सुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---