---Advertisement---

‘विनलेस’ ईस्ट बंगालविरुद्ध खेळ उंचावण्यास नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी उत्सुक

On: गुरूवार, डिसेंबर 16, 2021 7:19 PM
ISL-North-East-United-FC
---Advertisement---

गोवा| लागोपाठच्या पराभवांमुळे लीगमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले तरी हीरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) साखळीमध्ये शुक्रवारी (१७ डिसेंबर) ‘विनलेस’ एफसी ईस्ट बंगालविरुद्ध खेळ उंचावण्यास नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी उत्सुक आहे.

खालीद जमील यांच्या प्रशिक्षकपदाखालील नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीला शेवटच्या सामन्यांत हैदराबाद एफसीकडून १-५ असा मोठा पराभव पाहावा लागला. तरीही अद्याप एकही विजय न मिळवलेल्या ईस्ट बंगालविरुद्ध त्यांना कामगिरी उंचावण्याची संधी आहे. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने १३ गोल खाल्ले तरी उर्वरित हंगामात खेळ उंचावेल, अशी अपेक्षा जमील यांना वाटते. नॉर्थ ईस्ट युनायटेड ताज्या गुणतालिकेत ४ गुणांनिशी दहाव्या स्थानी आहेत. चार पराभवांसह एक विजय आणि एक बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे.

नॉर्थ ईस्ट युनायटेडसमोर प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींचे मोठे आव्हान आहे. व्ही. पी. सुहेर हा एकमेव सातत्याने खेळला आहे. सुहेरने ४७८ मिनिटे खेळताना एक गोल केला आहे. तसेच एक गोल करण्यास मदत केली आहे. यंदाच्या हंगामात आम्हाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. दुखापतींमुळे आम्हाला अनेक प्रमुख खेळाडूंविना खेळावे लागले. मी कारणे देत नाही. मात्र, आमचे सर्वच्या सर्व सहा परदेशी फुटबॉलपटू कुठल्याही सामन्यात खेळण्यासाठी पूर्णपणे फिट नव्हते. डेशॉर्न ब्राउन हॅमस्ट्रिंग दुखापतीने त्रस्त आहे. खॅसा कॅमारा आणि हरनॅन संताना पुढील सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. लागोपाठच्या पराभवांमुळे टीमचे मनोधैर्य खचलेले नाही. फुटबॉल खेळामध्ये काही वेळा तुम्हाला हवे तसे घडत नाही. त्यामुळे नव्याने सामना खेळताना मागील विजय अथवा पराभव महत्त्वाचा असतो. तिथे तीन गुण मिळणे महत्त्वाचे असते, असे जमील म्हणाले.

गुणतालिकेत तळाला (११व्या स्थानी) फेकले गेलेल्या एफसी ईस्ट बंगालला ६ सामन्यांत ३ गुण मिळवता आलेत. तीन पराभव पाहताना त्यांनी तितकेच सामने बरोबरीत सोडवले आहेत. शेवटच्या लढतीत केरळा ब्लास्टर्स एफसीला बरोबरीत रोखले. ईस्ट बंगालला एकही विजय मिळवता आला नसला तरी त्यांच्या नावावर ९ गोल आहेत. त्यांचा बचाव दुबळा ठरला आहे. एफसी ईस्ट बंगालने १५ गोल खाल्लेत. यंदाच्या हंगामात त्यांनीच सर्वाधिक गोल खाल्लेत.

अरिंदम भट्टाचार्य, जॅकीचंद सिंग आणि डॅरेन सिडोइल असे प्रमुख खेळाडू दुखापतगस्त झाल्याचा फटका ईस्ट बंगालला बसला आहे. मात्र, अँटोनिओ पेरॉसेविक त्यांच्यासाठी तारणहार ठरला आहे. क्रोएशियाच्या या फॉरवर्डने मागील काही लढतींमध्ये सुरेख खेळ केला आहे. मात्र, त्याला अन्य सहकाऱ्यांची अपेक्षित साथ लाभत नाही. मागील सामन्यात बरोबरीत समाधान मानावे लागले तरी केरळा ब्लास्टर्स एफसीविरुद्ध एफसी ईस्ट बंगालचा खेळ चांगला झाला. त्यामुळे नॉर्थ ईस्ट एफसीला त्यांना गृहित धरून चालणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: यजमान महाराष्ट्रासह बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू उपांत्यपूर्व फेरीत

पूना कॉलेज आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत विजयी

बॅक टू पॅव्हेलियन! चेन्नई सुपर किंग्स या ३ जुन्या खेळांडूंना पुन्हा करू शकतात संघात सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---