---Advertisement---

मुंबई इंडियन्सच्या ‘बेबी एबी’ची आयपीएल पदार्पणातच कमाल, मैदानात पाय टाकताच केला खास विक्रम

On: बुधवार, एप्रिल 6, 2022 10:30 PM
Dewald-Brevis
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या १४व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने त्यांच्या युवा खेळाडूंला पदार्पणाची संधी दिली. हा सामना बुधवारी (६ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ‘बेबी एबी’ या नावाने ओळखला जाणारा दक्षिण अफ्रिकेचा युवा फलंदाज अष्टपैलू डेवाल्ड ब्रेविसने या सामन्यातून स्वतःचे आयपीएल पदार्पण केले.

डेवाल्ड ब्रेविस (Dewald Bravis) दक्षिण अफ्रिकेच्या १९ वर्षाखालील संघासोबत काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक खेळला होता. विश्वचषकात त्याने कमाल प्रदर्शन केले होते आणि त्याची तुलना दक्षिण अफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्ससोबत केली गेली. ब्रेविसचा हा त्याच्या कारकिर्दीतील पहिला आयपीएल सामना असला, तरी या सामन्यात मैदानात पाय टाकताच त्याने स्वतःच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद केला आहे. तो आता सर्वात कमी वयात आयपीएल पदार्पण करणारा पाचवा खेळाडू बनला आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1511713581313658887

ब्रेविसचे वय सध्या १८ वर्ष आणि ३४२ दिवस आहे आणि या वयात मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल पदार्पणाची संधी दिली आहे. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणाऱ्यांमध्ये तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला. या यादीत पहिल्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान आहे. दुसऱ्या क्रमांकावर नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिछाने आहे. त्यानंतर यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल मार्श आहे. चौथ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानच्या नावावर आहे, तर पाचव्या क्रमांकावर आता ब्रेविसने जागा बनवली आहे.

दरम्यान, डेवाल्ड ब्रेविस आयपीएल २०२२च्या (IPL 2022) मेगा लिलावात १९ वर्षाखालील विश्वचषक खेळलेल्या खेळाडूंमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेण्यासाठी तब्बल ३ कोटी रुपये खर्च केले होते. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात त्याने १९ चेंडूत २९ धावा केल्या. यामध्ये २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

सर्वात कमी वयात आयपीएल पदार्पण करणारे खेळाडू
१. मुजीब उर रहमान – १७ वर्ष ११ दिवस
२. संदीप लामिछाने – १७ वर्ष २८३ दिवस
३. मिशेल मार्श – १८ वर्ष १७० दिवस
४. राशिद खान – १८ वर्ष १९७ दिवस
५. डेविड ब्रेविस – १८ वर्ष ३४२ दिवस*

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी! ‘हे’ दोन खेळाडू संघात आल्याने मिटणार फलंदाजी अन् गोलंदाजीची कटकट

KKR vs MI | नाणेफेक जिंकत श्रेयसचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, दोन नव्या बदलांसह दोन्ही संघ सज्ज

अरेरे! मोठ्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, वाढवली संघाची चिंता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---